मुंबई : सुंदर दिसण्यासाठी प्रत्येकजण पार्लर, ब्यूटी क्रिम, फेसमास्क आणि विविध घरगुती उपाय करतात. मात्र, प्रत्येकाची त्वचा वेगवेगळ्या प्रकारची असते. जर आपली त्वचा तेलकट असेल तर त्याची अधिक काळजी आपल्याला घ्यावी लागते. कारण तेलकट त्वचेवर पिंपल्सची अधिक समस्या निर्माण होते. यामुळे ज्यांची तेलकट त्वचा आहे, त्यांना अधिक काळजी घ्यावी लागते. जर आपलीही तेलकट त्वचा असेल तर आपण काही खास घरगुती फेसपॅक वापरले पाहिजेत.
एका वाडग्यात तीन चमचे दही, दोन चमचे बेसन, दोन ते तीन थेंब लिंबाचा रस, अॅपल व्हिगेनर आणि एक चमचा गुलाबपाणी घेऊन ते चांगले मिक्स करा. त्याची चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यासह मानेला लावा. चेहऱ्यावर सुमारे 20 मिनिटे सोडा, त्यानंतर चेहरा धुवा. तेलकट त्वचेची समस्या दूर करण्यासाठी हा पॅक अत्यंत फायदेशीर आहे. विशेष म्हणजे हा पॅक आपण आठ दिवसातून दोन वेळा वापरू शकता.
तेलकट त्वचेसाठी ग्रीन टी आणि मुलतानी मातीचा फेसपॅक अत्यंत फायदेशीर आहे. हा फेसपॅक बनवणे खूप सोपे आहे. यासाठी एक चमचा ग्रीन टीमध्ये, एक चमचा मुलतानी माती मिसळून पेस्ट बनवा आणि 15 ते 20 मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावा. नंतर चेहरा पाण्याने धुवा. एक मोठा चमचा मुलतानी माती, एक प्रोबायोटिक कॅप्सूल, दोन चमचे अॅपल सायडर व्हिनेगर पेस्ट तयार करण्यासाठी सर्व सामग्री एकत्र करा. पेस्ट तयार झाल्यानंतर चेहरा आणि मानेवर लावा.
काही लोकांना वाटते की त्यांची त्वचा तेलकट आहे, म्हणून त्यांना मॉइश्चरायझरची आवश्यकता नाही. जर तुम्हाला असे वाटत असेल तर तुम्ही चुकीचे आहात. तज्ज्ञांचे मत आहे की, मॉइश्चरायझर लावणे तुम्ही त्वचेला बंद केले असेल तर आपली समस्या कमी करण्याऐवजी वाढवते. मॉइश्चरायझर आपल्या त्वचेची चिकटपणा कमी करण्यास मदत करते म्हणून तेलकट त्वचा असेल तरी देखील मॉइश्चरायझरचा वापरल केला पाहिजे.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(This face pack is beneficial for eliminating the problem of oily skin)