Skin Care : मध, लिंबू, चंदन पावडरचा ‘हा’ फेसपॅक वापरा आणि चेहऱ्याच्या सर्व समस्या दूर करा!

| Updated on: Jul 16, 2021 | 2:14 PM

त्वचा चमकदार आणि चांगली तुम्हाला दिसावी वाटत असेल तर आपल्या त्वचेची विशेष काळजी घ्या. दरवेळी बाजारातून महागडे उत्पादने आणून वापरून आपली त्वचा काही काळासाठी चांगली होते.

Skin Care : मध, लिंबू, चंदन पावडरचा हा फेसपॅक वापरा आणि चेहऱ्याच्या सर्व समस्या दूर करा!
फेसपॅक
Follow us on

मुंबई : त्वचा चमकदार आणि चांगली तुम्हाला दिसावी वाटत असेल तर आपल्या त्वचेची विशेष काळजी घ्या. दरवेळी बाजारातून महागडे उत्पादने आणून वापरून आपली त्वचा काही काळासाठी चांगली होते. मात्र, जर तुम्हाला कायमसाठी त्वचा चांगली हवी असेल तर घरगुती उपाय करा. आपण घरामध्ये असलेल्या साहित्याच्या आधारे फेसपॅक तयार करू शकतो. (This face pack of honey, lemon, sandalwood powder is beneficial for the skin)

मध, लिंबू आणि चंदन पावडरचा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी आपल्याला मध 2 चमचे, चंदन पावडर 3 चमचे, 2 चमचे लिंबाचा रस आणि गुलाब पाणी लागणार आहे. हा फेसपॅक तयार करण्यासाठी वरील सर्व साहित्य एकत्र मिक्स करून घ्या. त्यानंतर त्याची बारीक पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्याला लावा. साधारण तीस मिनिटे ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर राहूदया आणि नंतर चेहऱ्या थंड पाण्याने धुवा.

लिंबूमध्ये साइट्रिक अॅसिड असते. हे त्वचेचे तेल नियंत्रित करण्यास मदत करते. मुरुमांचे मुख्य कारण असलेल्या तेल आणि मृत त्वचेच्या पेशी काढून टाकण्यास मदत करू शकते. हा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी 2 चमचे दही 2 चमचे लिंबाचा रस मिक्स करा. त्यानंतर त्याची चांगली पेस्ट तयार करा आणि संपूर्ण चेहऱ्याला लावा. ही पेस्ट साधारण वीस मिनिटे आपल्या चेहऱ्यावर ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने आपला चेहरा धुवा.

मुलतानी माती, मध आणि लिंबाचा फेसपॅक तयार करण्यासाठी मुलतानी माती एक चमचा, लिंबाचा रस एक चमचा आणि मध एक चमचा मिक्स करून घ्या आणि चांगली पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्याला आणि मानेला लावा. साधारण वीस ते तीस मिनिटे ही पेस्ट चेहऱ्यावर ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. ही पेस्ट आपण आठवड्यातून दोन ते तीन वेळा लावू शकतो.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(This face pack of honey, lemon, sandalwood powder is beneficial for the skin)