Skin Care : निरोगी त्वचेसाठी मसूर डाळीचे ‘हे’ फेसपॅक वापरा!

| Updated on: Jul 30, 2021 | 10:15 AM

त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी आणि त्वचा निरोगी आणि चमकदार करण्यासाठी मसूर डाळीचे फेसपॅक खूप फायदेशीर आहेत.

Skin Care : निरोगी त्वचेसाठी मसूर डाळीचे हे फेसपॅक वापरा!
फेसपॅक
Follow us on

मुंबई : बहुतांश लोकांना दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात मसूर डाळ खायला आवडते. मसूर पौष्टिकतेने समृद्ध आहे, म्हणून हे निरोगी अन्न मानले जाते. त्वचेच्या अनेक समस्या दूर करण्यासाठी आणि त्वचा निरोगी आणि चमकदार करण्यासाठी मसूर डाळीचे फेसपॅक खूप फायदेशीर आहेत. मसूर डाळीचे फेसपॅक त्वचेला लावल्यानंतर त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत मिळते. (This face pack of lentils is beneficial for healthy skin)

मसूर डाळीचा फेसपॅक तयार करण्यासाठी एक चमचे कोरफड जेल, लिंबाचा रस आणि मसूर डाळीची बारीक केलेली पेस्ट एकत्र मिक्स करा. ही पेस्ट चांगली मिक्स करून घ्या. त्यानंतर दहा मिनिटे ही पेस्ट तशीच ठेवा आणि आपल्या चेहऱ्याला लावा. साधारण वीस मिनिटे ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर राहूद्या. त्यानंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा. हा फेसपॅक आपण आठ दिवसातून दोन वेळा आपल्या चेहऱ्याला लावला पाहिजे. ज्यामुळे चेहरा तजेलदार होण्यास मदत होते.

दूधामध्ये मसूर डाळ, चंदन पावडर आणि संत्र्याचं साल रात्रभर भिजवा. दुसऱ्या दिवशी सकाळी हे सर्व घटक वाटून घट्ट पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि सुकू द्या. 20 मिनिटानंतर सर्क्युलर मोशनमध्ये हळूवार ते स्वच्छ करा. नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. यामुळे तुमची त्वचा उजळेल आणि सोबतच चेहऱ्यावरील अनावश्यक केसही दूर करेल.
मसूर डाळ त्वचेवर एका क्लीन्सरप्रमाणे काम करते. यासह मुरुमांच्या समस्येतूनही मुक्ती मिळते.

मसूर डाळ एक नैसर्गिक एक्सफोलिएटर प्रमाणे कार्य करते. ज्यामुळे आपल्या त्वचेचा रंग उजळ होण्यास देखील मदत होते. मसूर डाळीचा फेस पॅक बनवण्यासाठी आधी या डाळीची पावडर करून ठेवा. डाळीची पूड आणि दुध एकत्र करून त्यांची पेस्ट बनवा. हे स्क्रब आपल्या चेहऱ्यावर सुमारे 20 मिनिटे लावा आणि नंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा. जलद उपायासाठी आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा फेस पॅक वापरा.

(टीप : कोणत्याही आहार बदलापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Running Side Effects | जास्त वेळ धावणे महिलांसाठी धोकादायक, आरोग्यास होऊ शकते हानी!

Milk Testing : सावधान! घट्ट दिसण्यासाठी दुधात मिसळले जातायत ‘हे’ घटक, अशी तपासा दुधाची शुद्धता

(This face pack of lentils is beneficial for healthy skin)