मुंबई : सुंदर त्वचा सगळ्यांनाच हवी असते. मात्र, सुंदर त्वचा मिळवण्यासाठी त्वचेची तेवढी काळजी देखील घ्यावी लागते. आपल्या त्वचेची व्यवस्थित देखभाल केली तर नक्की त्वचा सुंदर होण्यास मदत होते. तजेलदार आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी आपण फेशियल मिस्टचा वापर केला पाहिजे. फेशियल मिस्टमुळे आपल्या त्वचेचा टोन सुधारण्यास मदत होते. (This facial mist is beneficial for keeping the skin glowing)
– कोरफड फेशियल मिस्ट आपल्या त्वचेसाठी फायदेशीर असते. फोरफड फेशियल मिस्ट घरी तयार करण्यासाठी कोरफडचा गर चार चमचे घ्या आणि त्यामध्ये चार चमचे गुलाब पाणी मिक्स करा. त्यानंतर ते एकजीव करा आणि एका स्प्रे बाटलीमध्ये ठेवा. दिवसभर हा स्प्रे वापरा.
– आपल्या त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी गुलाबाचे पाणी वापरले पाहिजे. गुलाबाचे पाणी आणि एक चतुर्थांश काकडीचा रस मिक्स करा. हे आपल्या त्वचेसाठीही फायदेशीर आहे. त्यात आवश्यक तेलाचे काही थेंब घाला. चांगल्या हायड्रेशनसाठी आपल्या चेहऱ्यावर हे लावा.
– फेशियल मिस्ट घरी तयार करण्यासाठी एक चमचा ग्लिसरीन आणि दोन चमचे काकडीची रस घ्या. हे दोन्ही चांगले मिक्स करून घ्या आणि आपल्या चेहऱ्याला लावा. यामुळे आपली त्वचा स्वच्छ आणि मऊ होण्यास मदत होते. दिवसातून एकदा तरी याचा वापर करा.
– त्वचेची काळजी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. रात्रीच्यावेळी रेटिनॉइड्स समाविष्ट करा. ते आपल्या त्वचेची पोत सुधारण्यास मदत करेल तसेच मुरुमांपासून बचाव करेल. रेटिनॉल-आधारित मॉइश्चरायझर किंवा सीरम वापरू शकता. त्वचेवरील मृत पेशी काढून टाकण्यासाठी आठवड्यातून एक्सफोलिएशन आणि स्टीम देऊ शकता. आठवड्यातून दोनदा सौम्य एक्फोलीएटर वापरा आणि आपल्या त्वचेला चमक कशी प्राप्त होते.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
शरीरातून घाम का निघतो?, प्रकृतीसाठी चांगलं की वाईट?, वाचा सविस्तर…https://t.co/YDbnEdsqyG | #Sweat | #Body | #Health | #immunesystem | #healthcaretips | #Skincare | #immunity |
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 2, 2021
(This facial mist is beneficial for keeping the skin glowing)