Hair Care : केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी ‘हे’ हेअर पॅक केसांना लावणे फायदेशीर !

| Updated on: Jul 15, 2021 | 7:38 AM

केस सुंदर मिळवण्यासाठी त्यांची काळजी घेणे खूप आवश्यक आहे. निरोगी केस मिळवण्यासाठी आपण काही घरगुती उपाय देखील करू शकतो. ज्यामुळे आपले केस सुंदर दिसण्यास मदत होते.

Hair Care : केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी हे हेअर पॅक केसांना लावणे फायदेशीर !
हेअर
Follow us on

मुंबई : केस सुंदर मिळवण्यासाठी त्यांची काळजी घेणे खूप आवश्यक आहे. निरोगी केस मिळवण्यासाठी आपण काही घरगुती उपाय देखील करू शकतो. ज्यामुळे आपले केस सुंदर दिसण्यास मदत होते. आज आम्ही तुम्हाला खास घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमचे केस सुंदर होण्यास मदत होते. तसेच आपण केस गळतीची समस्या दूर करण्यासाठी काही घरगुती उपाय केले पाहिजेत. (This hair pack is beneficial for beautiful hair)

केस गळतीची समस्या कायमची दूर करण्यासाठी आपण काही घरगुती उपाय केले पाहिजेत. ज्यामुळे केस गळती कमी होण्यास मदत होते. यासाठी एक केळी, एक वाटी दही, अर्धी वाटी मुलतानी माती, दोन ते तीन चमचे मध, कोरफड जेल, एक चमचा लिंबाचा रस एकत्र करून सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे मिक्स करा आणि केसांवर लावा. साधारण वीस मिनिटे ही पेस्ट आपल्या केसांवर ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने केस धुवा. हा हेअर पॅक आपण आठ दिवसातून तीनदा लावला पाहिजे.

कोरफड, नारळ तेल आणि कांद्याचा रस यांचे तेल घरी तयार करून केसांना लावले तर केस गळतीची समस्या दूर होऊ शकते. तेल तयार करण्यासाठी सर्वात अगोदर कांदा बारीक किसून अथवा कांदा ज्यूसरमधून काढला तरी चालतो मात्र, कांद्याचा रस हा ताजा असावा. त्यानंतर कोरफड द्या कोरफडीचा बाजूचा सर्व भाग काढून टाका त्यानंतर कांद्याचा रस कोरफड आणि नारळाचे तेल एकत्र करा रोज हे तेल केसांना लावा यामुळे तुमचे केस सुंदर, जाड, लांब आणि मजबूत दिसतील.

नारळ तेल आपल्या केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. आपण केसांचे टॉनिक बनवण्यासाठी कढीपत्त्यासह नारळ तेल मिक्स करू शकता. यासाठी तुम्ही नारळाचे तेल घ्या आणि त्यात कढीपत्ता घाला. आता हे मिश्रण गरम करा. मिश्रण थंड होऊ द्या आणि स्वच्छ कंटेनरमध्ये ठेवा. या मिश्रणाने आपल्या टाळूची संपूर्ण मालिश करा. हे आपल्या केसांवर मुळापासून टोकापर्यंत लावा. काही तास असेच ठेवा. त्यानंतर केस धुवा. आपण हे मिश्रण तयार करुन ठेवू शकतो. यामुळे केस गळतीची समस्या दूर होऊ शकते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(This hair pack is beneficial for beautiful hair)