मुंबई : त्वचेवरील काळ्या डागांमुळे आपली त्वचा निस्तेज दिसते. त्वचेवरील काळे डाग काढण्यासाठी बाजारामध्ये बऱ्याच क्रिम उपलब्ध आहेत. मात्र, म्हणावा तसा त्याचा उपयोग होत नाही. त्वचेवरील काळे डाग काढण्यासाठी आपण काही घरगुती उपाय केले पाहिजेत. ज्यामुळे काळ्या डागांची समस्या दूर होईल. विशेष म्हणजे हे घरगुती उपाय करण्यासाठी आपल्याला जास्त वेळ सुध्दा लागत नाही.
-तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग काढण्यासाठी सर्वात महत्वाचे आहे की, आपण स्वतःला हायड्रेट ठेवले पाहिजे. शरीराला हायड्रेट ठेवल्याने चेहरा हायड्रेट राहतो. यासाठी भरपूर पाणी प्यावे. जेव्हा शरीरात निर्जलीकरण होत नाही तेव्हा चेहरा नेहमी तेजस्वी दिसतो.
-चेहऱ्यावरील डाग दूर करण्याचा आणखी एक प्रभावी उपाय म्हणजे 6-7 तुळशीची पाने मधात मिसळा. या दोघांचे मिश्रण चेहऱ्यावर लावा आणि काही वेळ चेहऱ्यावर राहूद्या. त्यानंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा. यामुळे चेहऱ्यालवरील काळे डाग दूर होण्यास मदत होते.
-जर आपल्याला चेहऱ्यावरील काळे डाग दूर करायचे असतील तर कोरफड जेल लावा. कोरफडच्या जेलमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत. जे त्वचेचे डाग वेगाने कमी करतात. आपण ते थेट कोरफडचा गर काढून देखील आपल्या चेहऱ्याला लावू शकतो. या व्यतिरिक्त कोरफडचे जेल देखील बाजारात उपलब्ध आहे.
-चेहऱ्यावरील दागांपासून मुक्ती मिळवण्याचा आणखी एक प्रभावी मार्ग म्हणजे टोमॅटोचा रस. रात्री झोपताना टोमॅटोचा रस आपल्या चेहऱ्यावर लावा. त्यानंतर सकाळी उठून आपला चेहरा धुवा. हा उपाय आपण सतत आठ दिवस केला तर आपल्याला चांगला परिणाम दिसेल.
-जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही चेहर्यावरील डाग दूर करण्यासाठी मुलतानी माती वापर करू शकता. चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी हे खूप प्रभावी आहे. यासाठी दोन चमचे लिंबाचा रस मिक्स करून चेहऱ्यावर मुलतानी माती लावा. यामुळे काळे डाग दूर होतील.
-पपई हे एक नैसर्गिक एक्सफोलीएट आहे जे अँटी-एजिंगचे काम करते. एक्सफोलीएटिंग प्रक्रिया आपली मृत त्वचा काढून टाकते आणि त्वचेला आतून निरोगी बनवते. एक्सफोलिएशनसाठी कच्चा पपई एका भांड्यात स्मॅश करून घ्या आणि हा कुस्करलेला गर चेहऱ्यावर मास्क म्हणून लावा. हा पपईचा फेस मास्क वाळवल्यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा.
(टीप : कोणत्याही कृतीपूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.)
संबंधित बातम्या :
Weight Loss | ‘वेट लॉस जर्नी’दरम्यान वारंवार वजन तपासताय? मग ‘या’ गोष्टी आधी जाणून घ्या!
Coconut Water | रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी उपयुक्त ‘नारळ पाणी’, वाचा याचे फायदे…
(This home remedy is beneficial for removing blemishes on the face)