मुंबई : बऱ्याच लोकांची सकाळची सुरूवात एक कप चहाने होते. अनेकजण दिवसातून सात ते आठ कप चहा देखील पितात. मात्र, आपण नेहमी ऐकले असेल की, चहा आपल्या आरोग्याासाठी हानिकारक आहे. पण हाच चहा आपल्या केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. चहा तुम्हाला खराब झालेल्या केसांपासून ते निरोगी, चमकदार आणि मजबूत केस मिळून देतो.
चला तर जाणून घेऊयात चहा बद्दल अधिक…
ग्रीन टी आणि ब्लॅक टीने कालांतराने अनेकांना आकर्षित केले आहे. ग्रीन टीने आपले केस धुतल्यामुळे केसांच्या अनेक समस्या दूर होतात आणि केस गळती, निस्तेज केस तसेच कोंड्याची समस्या देखील दूर होण्यास मदत होते. अँटिऑक्सिडेंट, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लॅमेटरी गुणधर्मांनी समृद्ध, चहा केस गळणे टाळण्यास आणि केसांच्या वाढीस चालना देतो.
विशेषतः ब्लॅक टी केस गळतीस कारणीभूत असलेल्या डीएचटी हार्मोनला अवरोधित करण्यात मदत करते. टी-रिन्स आपल्या केसांसाठी आणि त्याच्या मागणीसाठी खूप सौम्य आणि सोपे असू शकते. बी व्हिटॅमिनने समृद्ध, ग्रीन टी तुमच्या केसांना मॉइश्चरायझ करण्यास आणि त्यांची रचना सुधारण्यास मदत करते.
टी ट्री ऑइल
टी ट्री ऑइल कोंडा, खाज सुटणे, टाळूचे संक्रमण किंवा केस गळणे इत्यादी दूर करण्यास मदत करते. शॅम्पूमध्ये टी ट्री ऑइल मिक्स करून केसांना लावणे फायदेशीर आहे. यामुळे केसांच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत मिळते. टी ट्री ऑइल 5-6 थेंब शॅम्पूमध्ये मिसळा आणि दोन मिनिटांसाठी केस आणि टाळूवर हलक्या हाताने मसाज करा. 5-8 मिनिटे सोडा. साध्या पाण्याने स्वच्छ धुवा आणि आठवड्यातून 2-3 वेळा ही प्रक्रिया पुन्हा करा. अंडी हे प्रथिने तसेच उत्तम चरबीचा स्रोत आहे. हा हेअर मास्क तयार करण्यासाठी 1 अंडे, 2 चमचे ऑलिव्ह ऑईल घ्या. अंडी आणि ऑलिव्ह ऑईल दोन्ही चांगले मिसळा. नंतर हा मास्क केसांना सुमारे 3० मिनिटे लावा आणि नंतर शॅम्पू करा.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक
Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!
Health care | सकाळी अनवाणी पायांनी गवतावर चालणे आरोग्यासाठी लाभदायी, वाचा याचे फायदे… https://t.co/xnbkgfB8Ea #HealthTips | #Barefoot | #HealthCare
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 24, 2021
(This home remedy is beneficial for the problem of dull hair and dandruff)