मुंबई : उन्हाळ्याचा हंगाम सर्वात जास्त त्वचेसाठी कठिण (Skin) असतो. यादरम्यान त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होतात. उन्हाळ्यात डिहायड्रेशनमुळे ओठ कोरडे होतात. कधीकधी ओठांचा (Lips) कोरडेपणा खूप वाढतो. त्यामुळे ओठातून रक्तही येऊ लागते. बरेच लोक महाग सौंदर्य उत्पादने म्हणजेच लिप बाम (Lip balm) देखील वापरतात. मात्र, लिप बाम लावूनही काही खास उपयोग होत नाही. मऊ आणि सुंदर ओठांसाठी तुम्ही अनेक नैसर्गिक घटक वापरू शकता. या घटकांचा वापर करून तुम्ही लिप बाम बनवू शकता, ते तुमचे ओठ मऊ आणि सुंदर बनवण्याचे काम करतील. चला जाणून घेऊया घरचे-घरी लिप बाम कसा तयार करायचा.
मध त्वचेसाठी मॉइश्चरायझर म्हणून काम करते. हा लिप बाम बनवण्यासाठी ग्लिसरीनमध्ये मधाचे काही थेंब मिसळा. फाटलेल्या आणि कोरड्या ओठांसाठी याचा वापर करा. तुम्ही मधात खोबरेल तेल आणि लॅव्हेंडर तेलाचे 2-3 थेंब देखील मिक्स करू शकता. हे त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी हे फायदेशीर आहे.
पपईचे चाैकशी 5-6 चौकोनी तुकडे घ्या. त्यांना मॅश करा. त्यात 1 चमचा मध घाला. हे ओठांवर लावा आणि 15 मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर ते स्क्रब करून काढून टाका. हे तुमच्या ओठांची मृत त्वचा काढून टाकण्याचे काम करते, ते ओठांचा काळेपणा दूर करते.
हा लिप मास्क तयार करण्यासाठी एक चमचे मध आणि 2 चमचे मॅश केलेला अॅव्होकॅडो आवश्यक आहे. हे दोन्ही चांगले मिसळा. 15 मिनिटे ओठांवर राहू द्या. यानंतर काढा, हे ओठांना हायड्रेट करण्याचे काम करते. अॅव्होकॅडोमध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजे यांसारख्या पोषक तत्वांचा समावेश असतो.
खोबरेल तेल आणि गुलाब पाणी यांच्या देखील लिप बाम त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. यासाठी आपल्याला दोन चमचे खोबरल तेल आणि चार चमचे गुलाब पाणी लागणार आहे. दोन्ही घटक चांगले मिक्स करून घ्या. त्यानंतर ही पेस्ट आपल्या ओठांवर लावा. यामुळे ओठांची त्वचा कोरडी पडणार नाही आणि काळेपणाही दूर होईल.
(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला घ्या)
संबंधित बातम्या :
उन्हाळ्यातील पुरळांची समस्या दूर करण्यासाठी हे घरगुती उपाय फायदेशीर, वाचा अधिक!
Health Care Tips : वाचा उष्माघात होण्याची कारणे, लक्षणे आणि उपाय डाॅक्टरांकडूनच!