मुंबई : फेस सीरम हा आपल्या त्वचेच्या (Skin) काळजीचा एक महत्त्वाचा भाग आहे. सीरमचा वापर मॉइश्चरायझरच्या आधी आणि टोनरनंतर केला जातो. सीरमचे अनेक प्रकार आहेत. यामध्ये स्किन ब्राइटनिंग सीरम, अँटी एजिंग सीरम, अँटी एक्ने सिरम इ. होममेड फेस सीरम तुमच्या त्वचेला पोषक तत्व देते. सीरम सहसा खूप महाग असतात, परंतु आपण ते घरी देखील बनवू शकता.
होममेड फेस सीरमचे साहित्य
-कोरफड जेल
-ग्लिसरीन
-व्हिटॅमिन ई कॅप्सूल
-बदाम तेल
-गुलाब पाणी
-खोबरेल तेल
घरच्या घरी अशाप्रकारे तयार करा फेस सीरम
काही व्हिटॅमिन ई कॅप्सूल घ्या. त्यांचे तेल काढा आणि एका लहान भांड्यात ठेवा. त्यात 3 टेबलस्पून कोरफड जेल आणि ग्लिसरीन घाला. 2 चमचे बदामाचे तेल, एक चमचे गुलाबजल आणि एक चमचे खोबरेल तेल घाला. सर्व साहित्य मिसळा. तुमचे होममेड फेस सीरम वापरण्यासाठी तयार आहे. परंतू त्याअगोदर काही वेळ फ्रीजमध्ये ठेवा. दिवसातून दोनदा याचा वापर करा.
होममेड फेस सीरमचे फायदे
कोरफड
कोरफडीतील अँटी बॅक्टेरियल, अँटी इन्फ्लेमेटरी आणि अँटी मायक्रोबियल मुरुम दूर ठेवण्यास मदत करते. केवळ मुरुमच नाही तर कोरफडचा नियमित वापर केल्याने त्वचेचे अतिनील किरणांपासून संरक्षण होते. यामुळे आपल्या चेहऱ्याला नेहमीच कोरफड लावली पाहिजे.
ग्लिसरीन
कोरड्या त्वचेसाठी हे फायदेशीर आहे. हे सोरायसिस आणि एक्जिमा सारख्या बुरशीजन्य संसर्गावर देखील उपचार करते. हे आपली त्वचा नैसर्गिकरित्या निरोगी आणि सुंदर बनवते. हिवाळ्याच्या हंगामामध्ये तर रोज रात्री झोपण्यापूर्वी आपल्या त्वचेला ग्लिसरीन लावले पाहिजे.
व्हिटॅमिन ई
व्हिटॅमिन ई नवीन पेशींच्या वाढीस प्रोत्साहन देते. व्हिटॅमिन ई ब्रेकआउटशी लढण्यासाठी देखील फायदेशीर आहे. हे मुक्त रॅडिकल्सला प्रतिबंधित करते आणि त्यांच्यामुळे होणारे मुरुम प्रतिबंधित करते.
बदाम तेल
बदामाचे तेल आपल्या त्वचेला उन्हापासून होणाऱ्या नुकसानापासून वाचवण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. हे नैसर्गिक सनस्क्रीन म्हणून काम करते. हे आपल्या त्वचेचे सन टॅन तसेच सनबर्नपासून संरक्षण करते.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..