चमकदार त्वचा हवीय, संत्री ते टोमॅटो ही फळं आहारात नक्की असूद्या

| Updated on: Mar 09, 2022 | 9:50 PM

निरोगी व चमकदार त्वचेसाठी ज्या प्रमाणे बाह्य घटक महत्वाचे आहेत, त्याच प्रमाणे आपण आहारात अंतर्गत घटक काय घेतोय, यालाही तेवढेच महत्व आहे. चमकदार त्वचेसाठी तुम्ही तुमच्या आहारात अनेक प्रकारच्या फळांचा समावेश करू शकता. यातून त्वचेला खोलवर पोषण मिळण्यास मदत होते.

चमकदार त्वचा हवीय, संत्री ते टोमॅटो ही फळं आहारात नक्की असूद्या
Skin Care
Image Credit source: TV9
Follow us on

नितळ व चमकदार त्वचा (glowing skin) सर्वांना हवी असते. आपल्या त्वचेबाबत आता महिलांप्रमाणेच पुरुषदेखील मोठ्या प्रमाणात जागृत झालेले दिसतात. आपली त्वचा चमकदार व तजेल रहावी, यासाठी महिलांकडून मोठ्या प्रमाणात विविध उपाय योजना केल्या जात असतात. निरोगी त्वचेसाठी कृत्रिम सौंदर्य प्रसाधनांव्यतिरिक्त सकस आहारदेखील घेणे गरजेचे असते. निरोगी आहार त्वचेला खोलवर पोषण देण्याचे काम करतो. त्वचेची काळजी घेण्यासाठी आहारात फळांचाही (fruits) समावेश करणे आवश्‍यक ठरत असते. फळे अनेक पोषक आणि जीवनसत्त्वांनी समृद्ध असतात. फळे अँटिऑक्सिडंट्सचेही चांगले स्त्रोत आहेत. फळांमध्ये असलेले विविध पोषक घटक त्वचेला तजेलदार आणि निरोगी बनवतात. ते त्वचेशी संबंधित अनेक समस्या दूर करण्यास मदत करतात. फळे त्वचा चमकदार बनवण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका पार पाडतात. कोणत्या फळांचा आहारात (diet) समावेश करावा याची माहिती या लेखातून घेणार आहोत.

संत्री

संत्र्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळते. यातून रोगप्रतिकार शक्ती वाढीसह आरोग्याला अनेक फायदे आहेत. संत्र्यात असलेल्या ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यास मदत करते. शिवाय अतिनील किरणांमुळे त्वचेचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते. यामुळे त्वचेची जळजळ कमी होते. संत्र्याचा आपल्या आहारात समावेश करावा, याशिवाय तुम्ही याचा वापर ‘फेसपॅक’ म्हणूनही करू शकता. त्याचे अनेक फायदे आहेत.

पपई

पपई हे जीवनसत्त्व अ, ब आणि क चा चांगला स्रोत आहे. हे अँटीवायरल, अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्मांनी समृद्ध आहे. चामखीळ, एक्जिमा, अल्सर इत्यादी त्वचेशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत होते. साधारणत: एका दिवसात एक वाटी पपईचे सेवन करू शकता. यासोबतच तुम्ही याचा वापर फेसपॅक म्हणूनही करू शकता.

काकडी

काकडीत व्हिटॅमिन सी आणि के मुबलक प्रमाणात असते. त्यात मुबलक प्रमाणात फायबरदेखील असते. त्यात पाण्याचे प्रमाणही जास्त असते, त्यामुळे यातून शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. रोजच्या आहारात काकडीचा सॅलडमध्ये समावेश करू शकता. याशिवाय सँडविच आणि ज्यूसच्या रूपातही तुम्ही याचे सेवन करू शकता. तुमच्या डोळ्यांना आराम मिळावा आणि हायड्रेटेड राहण्यासाठी तुम्ही तुमच्या डोळ्यांवर काकडीचे तुकडे देखील ठेवू शकता.

आवळा

आवळा हा ‘व्हिटॅमिन सी’चा उत्तम स्रोत आहे. त्यात अँटिऑक्सिडंट गुणधर्म आहेत. त्यात पाण्याचे प्रमाणही भरपूर असते. हे फक्त तुमच्या त्वचेसाठीच नाही तर तुमच्या केसांसाठी आणि डोळ्यांसाठीही फायदेशीर आहे. आवळ्यापासून तुम्ही गुसबेरी जाम, स्मूदी, लोणचे बनवू शकता. आवळा कच्चादेखील खाऊ शकतो.

टोमॅटो

टोमॅटोचा वापर भाजीत मोठ्या प्रमाणात केला जात असतो. जेवणाची चव वाढवण्यासोबतच टोमॅटो त्वचेसाठी आणि आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. त्वचेचे छिद्र कमी करण्यास आणि फ्री रॅडिकल्सला प्रतिबंध करण्यास टोमॅटोची मदत होत असते. टोमॅटोत लाइकोपीन अँटीऑक्सिडंट असते. त्वचेवर टोमॅटो घासल्याने तुम्हाला टॅनिंगपासून मुक्ती मिळू शकते.

(टीप : सदर मजकूर हा उपलब्ध माहितीच्या आधारे तयार करण्यात आला आहे, याला कुठल्याही प्रकारचा सल्ला समजू नये, अधिक माहितीसाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

इतर बातम्या:

Raj Thackeray : ‘संजय राऊत… कॅमेरा आला की सुरु, कॅमेरा हटला की नॉर्मल’, राऊतांची नक्कल करत राज ठाकरेंची टोलेबाजी

Video : राज्यपालांना शिवराय कळलेत का? राज्यपालांची नक्कल करत राज ठाकरेंनी घेतला समाचार