मुंबई : सध्याच्या हंगामात सूर्यप्रकाशामुळे त्वचा निस्तेज होते. यामुळे लालसरपणा, सुरकुत्या, मुरुमांचा त्रास होतो. या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी आपण अनेक प्रकारचे सौंदर्य उत्पादने वापरतो. मात्र, तरीही म्हणावा तसा फरक आपल्या त्वचेमध्ये दिसत नाही. चेहऱ्याच्या या समस्या दूर करण्यासाठी आपण घरगुती उपाय केले पाहिजेत. विशेष म्हणजे घरगुती उपाय केल्याने आपली त्वचा सुंदर दिसण्यास मदत होते. (To get glowing skin Try this special remedy)
तांदळाचे पाणी
तांदळाच्या पाण्याचा वापर त्वचेच्या देखभालीच्या नित्यक्रमात केला जातो. हे अँटीऑक्सिडेंट्स, स्टार्च, प्रथिने समृद्ध आहे जे त्वचेला चमकदार ठेवण्यास मदत करते. यासाठी सर्वप्रथम तांदूळ धुवून स्वच्छ करावे व नंतर एका भांड्यात पाणी गाळून ठेवा. हे पाणी काही वेळ फ्रीजमध्ये ठेवा आणि त्यानंतर आपल्या संपूर्ण चेहऱ्याला लावा. यामुळे आपली त्वचा चमकदार होण्यास मदत होईल.
काकडी
काकडी त्वचेला थंड आणि आराम देण्याचे काम करते. त्यात व्हिटॅमिन सी आणि कॅफिक अॅसिड असते. ज्यामुळे त्वचेतील जळजळ कमी होते. यामुळे त्वचा हायड्रेटेड राहते. आपण घरच्या घरी काकडीचा फेसपॅक देखील तयार करू शकतो. यासाठी काकडीची पेस्ट, लिंबाचा रस दोन चमचे आणि एक चमचा मध मिक्स करा आणि संपूर्ण चेहऱ्याला लावा. 15 मिनिटांनंतर आपला चेहरा कोमट पाण्याने धुवा.
कोरफड
कोरफड अँटी-ऑक्सिडंट्स समृद्ध असते, हे गडद डाग काढून त्वचेला हायड्रेट आणि मॉइश्चराइझ करते. यासाठी आपल्याला 10 ते 15 तुळशीच्या पानांची पेस्ट आवश्यक आहे. या पेस्टमध्ये कोरफडचा गर मिक्स करा. या दोन गोष्टी चांगल्या प्रकारे मिसळा आणि पेस्ट तयार करा. हे मिश्रण बर्फ क्यूब प्रमाणे फ्रीजमध्ये ठेवा. त्यानंतर मसाज करत चेहऱ्यावर लावा. यामुळे चेहऱ्यावरील टॅन निघून जाण्यास मदत होते.
गुलाब पाकळ्या आणि दालचिनी
दालचिनी त्वचेवरील सुरकुत्या काढण्याचे काम करते. तसेच गुलाबाच्या पाकळ्या देखील आपल्या त्वचेसाठी फायदेशीर असतात. यात व्हिटॅमिन सी आणि ई असते जे त्वचेचा दाह कमी करण्यास आणि सुधारण्यास मदत करतात. दालचिनी आणि गुलाबाच्या पाकळ्याचा फेसपॅक घरी तयार करण्यासाठी आपल्याला दोन चमचे दालचिनीची पावडर, दोन चमचे गुलाबाच्या पाकळ्या आणि पाणी लागणार आहे. सर्वात प्रथम दालचिनी आणि गुलाब पाकळ्याची बारीक पेस्ट तयार करून घ्या आणि त्यामध्ये थोडे पाणी मिक्स करा. ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा आणि थंड पाण्याने चेहरा धुवा.
(टीप : कुठल्याही कृतीपूर्वी डॉक्टरांचा किंवा सौंदर्यतज्ज्ञांचा सल्ला घेणे बंधनकारक आहे.)
संबंधित बातम्या :
Skin Care | चेहऱ्यावरील नको असणाऱ्या केसांमुळे त्रस्त आहात? पार्लर विसरा आणि ‘हे’ उपाय ट्राय करा!
Hair Care | केसांची निगा राखण्यासाठी सोनम कपूरच्या टिप्स, तुम्हीही एकदा ट्राय करून पाहा!
Health | देशातील 10 टक्के महिला PCODने ग्रासित, जाणून घ्या ‘या’ आजाराबद्दल…https://t.co/j8mizk9UJ9#PCOD #health
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 17, 2020
(To get glowing skin Try this special remedy)