डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतायत? मग ‘हे’ 4 टोमॅटोचे खास पॅक वापरा!

| Updated on: Jul 15, 2021 | 12:02 PM

झोपेचा अभाव आणि ताणतणावामुळे आपल्या डोळ्यांखाली डार्क सर्कल तयार होतात. आपण कितीही काळजी घेतली तरी, कामाच्या ताणामुळे आणि झोपेच्या वेळेमुळे डोळ्यांखाली डाग सर्कल होतात.

डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतायत? मग हे 4 टोमॅटोचे खास पॅक वापरा!
डार्क सर्कल
Follow us on

मुंबई : झोपेचा अभाव आणि ताणतणावामुळे आपल्या डोळ्यांखाली डार्क सर्कल तयार होतात. आपण कितीही काळजी घेतली तरी, कामाच्या ताणामुळे आणि झोपेच्या वेळेमुळे डोळ्यांखाली डार्क सर्कल होतात. डार्क सर्कल कमी करण्यासाठी आपण बरेच साैंदर्य उत्पादने वापरतो. मात्र, म्हणावा तसा फरक पडत नाही. डार्क सर्कल कमी करण्यासाठी आपण काही घरगुती उपाय केले पाहिजेत. ज्यामुळे डार्क सर्कल कमी होण्यास मदत होते. (Tomatoes are beneficial for removing dark circles)

टोमॅटो आणि बटाटा

डार्क सर्कल कमी करण्यासाठी टोमॅटो आणि बटाटा अतिशय फायदेशीर आहे. बटाटा आणि टोमॅटोची बारीक पेस्ट तयार करा आणि डार्क सर्कलवर लावा. साधारण वीस मिनिटे ही पेस्ट डार्क सर्कलवर तशीच ठेवा आणि नंतर थंड पाण्याने धुवा. आपण सतत आठ दिवस ही पेस्ट डार्क सर्कलवर लावली तर डाग सर्कल कमी होण्यास मदत होते.

टोमॅटो आणि लिंबू

डार्क सर्कल कमी करण्यासाठी एक टोमॅटो घ्या आणि ते मध्यभागामधून कट करून घ्या. त्यानंतर त्यावर लिंबाचा रस मिक्स करा आणि डार्क सर्कलवर लावा. साधारण वीस मिनिटे तसेच ठेवा आणि आपला चेहरा धुवा. हा घरगुती उपाय आपण सतत केला तर डार्क सर्कल कमी होण्यास मदत होईल.

टोमॅटो आणि कोरफड

डार्क सर्कलची समस्या दूर करण्यासाठी आपण एक टोमॅटो आणि चार चमचे कोरफडचा गर घ्या. त्यानंतर याची चांगली पेस्ट तयार करा आणि डार्क सर्कलवर लावा. साधारण तीस मिनिटे ही पेस्ट आपल्या डार्क सर्कल तशीच ठेवा आणि नंतर कोमट पाण्याने धुवा. हा उपाय आपण दररोज केला पाहिजे.

टोमॅटो, पुदिना आणि काकडी

डार्क सर्कल कमी करण्यासाठी ही सर्वात फायदेशीर पेस्ट आहे. ही पेस्ट तयार करण्यासाठी आपण एक टोमॅटो, चार ते पाच पुदिना पाने आणि अर्धी काकडी घ्या. टोमॅटो, पुदिना आणि काकडी एकत्र मिक्स करा आणि त्याची चांगली पेस्ट तयार करून घ्या. ही पेस्ट डार्क सर्कलवर लावा. साधारण वीस मिनिटे ही पेस्ट तशीच राहूद्या आणि नंतर थंड पाण्याने धुवा. ही पेस्ट आपण आठ दिवसातून एकदा लावली पाहीजे.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

(Tomatoes are beneficial for removing dark circles)