संत्रे हे अतिशय स्वादिष्ट आणि हेल्दी फळ आहे. ते आपली त्वचा आणि आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर ठरते. संत्र्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते. संत्र्याप्रमाणेच त्याचे सालही (Orange Peel) खूप उपयोगी असते. ती सालं फेकून देण्यापेक्षा त्याचा वापर त्वचेचं सौंदर्य जपण्यासाठी (Skin care) व वाढवण्यासाठी करता येतो. त्यामध्ये ॲंटी- बॅक्टेरियल गुणधर्म असतात. ज्यामुळे पिंपल्स, मुरूमे कमी होण्यास मदत होते. संत्र्याची साल वाळवून, त्याची पूड करून त्याचा वापर फेसपॅक (face pack)बनवण्यासाठी करता येतो. त्यामुळे केवळ मुरुमे कमी होत नाहीत, तर त्यामुळे पडलेले काळे डागही कमी होतात. संत्रं खाऊन झाल्यावर त्याचे साल स्वच्छ धुवून उन्हात कडकडीत वाळवून घ्या. त्यानंतर मिक्समरमधून फिरवून त्याची पूड करून घ्या. ही पावडर वापरून वेगवेगळे फेसपॅक कसे बनवायचे, ते जाणून घेऊया.
एका वाटीत चमचाभर संत्र्याच्या सालीची पूड घ्या. त्यामध्ये गजेनुसार पाणी घालून पेस्ट बनवा. आता ही पेस्ट चेहरा व मानेला लावून थोडा वेळ मसाज करा. हा पॅक चेहऱ्यावर काही वेळ ठेवा. वाळल्यानंतर चेहरा व मान पाण्याने स्वच्छ धुवा. चेहरा मऊ कापडाने पुसून घ्या. हा पॅक आठवड्यातून 2-3 वेळा चेहऱ्याला लावावा.
एका बाऊलमध्य एक चमचा संत्र्याची पूड घ्या. त्यामध्ये थोडा कोरफडीचा रस ( ॲलोव्हेरा जेल) घालावे. दोन्ही गोष्टी नीट, एकत्र मिसळून घ्या. हा पॅक चेहरा, तसेच मानेवर लावावा. व थोडा वेल चेहऱ्याला मसाज करावा. काही वेळानंतर हा फेसपॅक पाण्याने धुवून टाकावा व चेहरा स्वच्छ पुसावा. संत्र्याच्या सालीतील पोषक गुणधर्मांमुळे त्वचेचे पोषण होते, तिचा पोत सुधारतो व रंगही उजळतो. कोरफडीचा रसही त्वचेसाठी फायदेशीर ठरतो. हा फेसपॅक आठवड्यातून 3-4 वेळा लावाला. काही दिवसांत अपेक्षित परिणाम दिसून येईल.
एका बाऊलध्ये संत्र्याच्या वाळलेल्या सालीची पूड घेऊन त्यामध्ये थोडा मध मिसळावा. ते दोन्ही पदार्थ नीट मिसळून पॅक बनवा. हे मिश्रण चेहेऱ्यावर नीट पसरून लावा. 15 ते 20 मिनिटे ते चेहऱ्यावर राहू द्या. वाळल्यानंतर पाण्याने चेहरा स्वच्छ धुवा. हा फेसपॅक आठवड्यातून 2-3 वेळा चेहऱ्याला लावावा. मधातील औषधी गुणधर्मांमुळे त्वचेला ग्लो येतो.
एका वाटीत 1 चमचा संत्र्याच्या सालीची पावडर घ्या. त्यामध्ये गरजेनुसार लिंबाचा रस मिसळा. हे मिश्रण नीट एकजीव करून फेटून घ्या. आता हा पॅक चेहरा व मानेवर लावून 20-25 मिनिटे वाळू द्यावे. त्यानंतर चेहरा पाण्याने स्वच्छ धुवावा. हा फेसपॅक आठवड्यातून किमान 2-3 वेळा लावावा. हळूहळू चेहऱ्यावरील पिंपल्स, मुरुमे, काळे डाग कमी होतील. त्वचेचा पोत सुधारेल व ती चमकदार होईल.