मुंबई : केस आणि त्वचा सुंदर मिळवण्यासाठी त्यांची काळजी घेणे खूप आवश्यक आहे. निरोगी आणि हेल्दी त्वचा, केस मिळवण्यासाठी आपण काही घरगुती उपाय देखील करू शकतो. ज्यामुळे आपली त्वचा आणि केस सुंदर दिसण्यास मदत होते. आज आम्ही तुम्हाला खास घरगुती उपाय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची त्वचा आणि केस सुंदर होतील.
(Try these home remedies to get beautiful skin and hair)
आयुर्वेदात तुळशीला औषधी वनस्पती म्हणून महत्त्व प्राप्त झाले आहे. तुळशीचे सेवन आपल्या शरीराला बर्याच आजारांपासून सुरक्षित ठेवते. विशेष म्हणजे तुळशी आपल्या केसांसाठी देखील खूप फायदेशीर आहे. केस गळती रोखण्यासाठी आपण तुळशीचा हा खास हेअर मास्क वापरू शकतात. यासाठी आपल्याला तुळशीची चार ते पाच पाने, दही, हळद आणि गुलाब पाणी लागणार आहे. हे सर्व साहित्य एकत्र मिक्स करा आणि त्याची चांगली पेस्ट तयार करा आणि चेहऱ्याला लावा.
हा फेसपॅक आपण आठवड्यातून दोन ते तीन वेळा चेहऱ्याला लावल्याने आपली त्वचा सुंदर होईल. साहित्य 2 चमचे क्ले, 2 एक्टिवेटिड कॅप्सूल, 2 चमचे अॅपल सायडर व्हिनेगर, एक थेंब तेल या सर्व गोष्टी एका भांड्यात चांगल्या मिसळा आणि जाड पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहर्यावर लावा आणि 15 मिनिटानंतर तोंड धुवा. हा फेसपॅक त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे, कारण ते त्वचेतून जादा तेल काढून टाकण्याचे काम करते. याशिवाय अॅपल सायडर व्हिनेगरचे थेंब आणि तेल मुरुमांशी लढण्यास मदत करतात.
आपण स्किनकेअर उत्पादने जास्त वापरत नसाल तरी, किमान मूलभूत स्किनकेयर नित्यक्रम दररोज पाळलेच पाहिजेत. क्लींजिंग, टोनिंग आणि मॉइश्चरायझिंग ही दिनचर्या त्वचेसाठी गरजेची आहे. या तीन स्टेप्स करण्यासाठी मोजून काही मिनिटे लागतील. परंतु, नित्यनियमाने केल्यास आपल्या त्वचेत बरेच बदल दिसून येतील. ही उत्पादने निवडताना प्रथम आपल्या त्वचेचा पोत लक्षात घ्यावा. त्यानुसारच उत्पादने खरेदी करा.
(टीप : कुठल्याही कृतीपूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Papaya | पपईचे अतिसेवन शरीरासाठी घातक, अनेक आजारांना मिळेल निमंत्रण!
Beauty Tips | काजळ लावताना ते पसरण्याची भीती वाटतेय? मग ट्राय करा ‘या’ सोप्या टिप्स!
Eczema Myth | ‘एक्झिमा’ आजाराबद्दल लोकांमध्ये संभ्रमाची स्थिती, जाणून घ्या या मागचं पूर्ण सत्य…#eczema | #Health | #skincare | #skincareproducts https://t.co/azKyegZj0a
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 26, 2021
(Try these home remedies to get beautiful skin and hair)