चमकदार त्वचेसाठी बटाट्यापासून बनवलेला फेस मास्क वापरा; जाणून घ्या याचे फायदे

| Updated on: Jul 12, 2021 | 7:56 AM

आपली त्वचा अधिक चमकदार बनवण्यासाठी देखील आपण बटाट्याचा वापर करू शकतो. बटाट्यापासून आपण अनेक प्रकारचे फेस मास्क बनवू शकतो. (Use a face mask made from potatoes for glowing skin; know the benefits)

चमकदार त्वचेसाठी बटाट्यापासून बनवलेला फेस मास्क वापरा; जाणून घ्या याचे फायदे
चमकदार त्वचेसाठी बटाट्यापासून बनवलेला फेस मास्क वापरा
Follow us on

मुंबई : बटाट्याचा वापर अधिकाधिक रेसिपींमध्ये केला जातो. बटाट्यामध्ये व्हिटॅमिन सी, बी 1, बी 3, बी 6 , मॅग्नीशियम, पोटॅशियम आणि फॉस्फोरस यांसारख्या मिनरलचे प्रमाण खूप असते. यात अँटीऑक्सिडेंट गुणचा समावेश आहे. हे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. आपली त्वचा अधिक चमकदार बनवण्यासाठी देखील आपण बटाट्याचा वापर करू शकतो. बटाट्यापासून आपण अनेक प्रकारचे फेस मास्क बनवू शकतो. (Use a face mask made from potatoes for glowing skin; know the benefits)

चांगल्या त्वचेसाठी बटाट्याचा पॅक

यासाठी 3 चमचे बटाट्याचा रस आणि 2 चमचे मधाची आवश्यकता आहे. बटाट्याचा रस आणि मध यांचे मिश्रण तयार करून घ्या. हे मिश्रण आपल्या चेहऱ्यावर आणि मानेवर 10 ते 15 मिनिटांसाठी ठेवा. मिश्रण सुकल्यानंतर चेहरा स्वच्छ धुवा. मध आपल्या त्वचेला मॉइस्चराइज करते. बटाट्याचा रस ऍसिडिक असतो. त्याची आपल्या त्वचेची चमक वाढवण्यासाठी फार मोठी मदत होते.

चमकदार त्वचेसाठी बटाटा आणि लिंबाचा फेस मास्क

हा फेस मास्क बनवण्यासाठी 2 चमचे बटाट्याचा रस, 2 चमचे लिंबाचा रस आणि अर्धा चमचा मधाची आवश्यकता असते. या सर्व पदार्थांचे मिश्रण तयार करा. हे मिश्रण 15 मिनिटे मान आणि चेहऱ्यावर ठेवा. त्यानंतर पाण्याने चेहरा आणि मान स्वच्छ धुवू शकता. लिंबू आणि बटाट्यामध्ये एस्ट्रिंजेंट गुण असतात. त्याचे आपल्या चेहऱ्यावरील तेल काढून टाकण्यास मदत होते. त्वचेवरील छोटी छोटी छिद्रे दूर करून त्वचा आरोग्यदायी करण्यास बटाटा आणि लिंबाच्या फेस मास्कचा उपयोग होतो.

पिग्मेंटेशनसाठी बटाटा आणि तांदळाच्या पिठाचा पॅक

हा पॅक तयार करण्यासाठी 1 चमचा बटाट्याचा रस, 1 चमचा टोमॅटोचा रस आणि 1 चमचा मधाची आवश्यकता असते. या सर्व घटकांचे मिश्रण तयार करा. हे मिश्रण साधारण 15 ते 20 मिनिटांसाठी तुमच्या चेहरा आणि मानेवर लावा. टोमॅटो आणि बटाट्यामध्ये एंटीऑक्सीडेंट खूप प्रमाणात असतात. त्याची आपल्या त्वचेवरील किटाणू आणि बॅक्टेरिया दूर ठेवण्यास मदत होते.

तेलकट त्वचेवर बटाटा आणि ओट्सचा फेस मास्क

तेलकट त्वचेवर उपाय म्हणून तुम्ही जर बटाटा आणि ओट्सचा फेस मास्क बनवू इच्छित असाल तर ही कृती समजून घ्या. उकडलेले बटाटे, 2 चमचे दूध, 1 चमचा ओट्स आणि 1 चमचा लिंबूचा रस घ्या. एक बाऊलमध्ये बटाट्याचा किस घ्या, त्यात इतर घटक मिसळा. त्यापासून एक पेस्ट तयार करा. ही पेस्ट तुमच्या चेहऱ्यावर लावा आणि 30 मिनिटांसाठी ठेवा. (Use a face mask made from potatoes for glowing skin; know the benefits)

इतर बातम्या

कल्याणच्या प्रसिद्ध उद्योजकावर वीज चोरीचा गुन्हा

ऑनलाईन व्यवसायातून बक्कळ पैसे कमवा; जाणून घ्या या सात टिप्स