मुंबई : चेहऱ्यावरील पिंपल्समुळे काळे डाग येण्याची शक्यता असते. बऱ्याच क्रिम वापरूनही चेहऱ्यावरील पिंपल्स जात नाहीत. आपणही जर पिंपल्सच्या समस्येमुळे त्रस्त असाल तर आपण काही घरगुती उपाय केले पाहिजे. ज्यामुळे तुमची पिंपल्यची समस्या दूर होण्यास मदत होईल. (Use a neem face pack to get rid of acne on the face)
जर आपल्याला मुरूमाची समस्या दूर करायची असेल तर आपण दहा ते बारा कडुलिंबाची पाने घ्या आणि त्याची बारीक पेस्ट तयार करा. या पेस्टमध्ये तीन चमचे गुलाब पाणी मिक्स करा आणि मुरूम असलेल्या त्वचेवर हे लावा. साधारण वीस मिनिटे ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर राहूद्या. त्यानंतर कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा.
चेहऱ्यावरील पिंपल्सची समस्या दूर करण्यासाठी आपण हळद, लिंबू, मुलतानी माती, चंदन पावडर, खोबरेल तेल आणि गुलाब पाणी मिक्स करून चेहऱ्याला लावले पाहिजे. ही पेस्ट तयार करण्यासाठी वरील सर्व साहित्य एकत्र मिक्स करा आणि त्याची बारीक पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर लावा. साधारण वीस मिनिटांनी आपला चेहरा कोमट पाण्याने धुवा.
पिंपल्स कमी करण्यासाठी कडुलिंबाची पाने अत्यंत फायदेशीर असतात. कडुलिंबामध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात. हे केवळ आपले वजन नियंत्रित करण्याचे काम करत नाहीतर आपल्या त्वचेवरील पिंपल्स घालवण्याचे देखील काम करते. यासाठी आपल्याला सात ते आठ कडुलिंबाची पाने लागणार आहेत. ही पाने बारीक करून त्याची चांगली पेस्ट तयार करा आणि आपल्या पिंपल्सवर लावा.
(टीप : कुठल्याही कृतीपूर्वी डॉक्टरांचा किंवा सौंदर्यतज्ज्ञांचा सल्ला घेणे बंधनकारक आहे.)
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Eczema Myth | ‘एक्झिमा’ आजाराबद्दल लोकांमध्ये संभ्रमाची स्थिती, जाणून घ्या या मागचं पूर्ण सत्य…#eczema | #Health | #skincare | #skincareproducts https://t.co/azKyegZj0a
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 26, 2021
(Use a neem face pack to get rid of acne on the face)