मुंबई : उन्हाळ्याच्या हंगामाला नुकताच सुरूवात झाली आणि त्वचेच्या (Skin) असंख्य समस्या लगेचच सुरू झाल्या आहेत. घामामुळे त्वचा खूप चिकट होते. यामुळे त्वचेवर टॅन आणि पिंपल्सची समस्या निर्माण होते. उन्हामुळे (Summer) त्वचा काळी पडण्यासही सुरूवात होते. या सर्व समस्या दूर करण्यासाठी घरगुती उपाय अत्यंत फायदेशीर आहेत. आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, कोरफड आपल्या त्वचेसाठी खूप जास्त फायदेशीर (Beneficial) आहे. उन्हाळ्यामध्ये त्वचेची निगा राखण्यासाठी कोरफडची मदत घ्या. फेसपॅक, फेसवाॅश आणि स्क्रब म्हणूनही आपण कोरफडचा वापर करू शकतो.
त्वचेचा चिकटपणा दूर करण्यासाठी महागडे फेसवॉश वापरण्यापेक्षा आपण कोरफडची मदत घ्यायला हवी. कोरफडमुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यासोबतच कोरफड फेसवाॅश त्वचेसाठी फायदेशीर आहे. यासाठी कोरफडमध्ये एक चमचा दूध आणि एक चमचा लिंबाचा रस मिसळून फेसवॉशप्रमाणे चेहऱ्यावर लावा. यामुळे तुमच्या त्वचेचा चिकटपणा दूर होईल.
उन्हाळ्यात टॅनिंग आणि सनबर्नची समस्या असते. ही समस्या टाळण्यासाठी तुम्ही कोरफड जेलचाही वापर करू शकता. दररोज कोरफड जेल लावल्याने तुमच्या त्वचेचे काळे डाग दूर होतील, त्वचा स्वच्छ आणि चांगली होईल. यासाठी तुम्हाला महागड्या उत्पादनांची गरज आहे.
कोरफड जेल वापरून आपण चेहऱ्यावरील मुरूमाची समस्या दूर करू शकतो. कोरफड जेलमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. जे त्वचेवर मुरुम तयार होण्यास प्रतिबंध करतात. जर तुमच्या चेहऱ्यावर मुरुमांची समस्या असेल तर तुम्ही दररोज रात्री झोपताना कोरफड चेहऱ्याला लावा आणि सकाळी चेहरा थंड पाण्याने धुवा.
कोरफडीमध्ये फॉलिक अॅसिड असते, जे आपल्या त्वचेसाठी खूप जास्त फायदेशीर असते. आरोग्याच्या दृष्टीने कोरफडीची पाने ही नैसर्गिकरित्या प्रभावशाली आयुर्वेदीक वनस्पती आहे. कोरफडीचा गर त्वचेला थंडावा देतो. विशेष म्हणजे आठवड्यातून तीन वेळा जर आपण कोरफडचा रस उपाशी पोटी पिला तर आरोग्यासोबतच केस आणि त्वचेच्या समस्या दूर होण्यास मदत होते.
(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)
संबंधित बातम्या :
Health : उन्हाळ्यात आंब्यापासून बनवलेल्या या 4 स्वादिष्ट आणि आरोग्यदायी पेयांचे सेवन नक्की करा!
Health Care Tips : निरोगी राहण्यासाठी या 3 पदार्थांचा आहारात नक्कीच समावेश करा!