मुंबई : उन्हाळ्यामध्ये (Summer) त्वचेच्या अनेक समस्यांना सामोरे जाण्याची वेळ येते. या ऋतूत त्वचेवर टॅनिंग होऊन निस्तेज आणि खराब त्वचा होते. उन्हाळ्यात त्वचेची डबल काळजी घ्यावी लागते. उन्हाळ्यात त्वचेची (Skin) काळजी घेण्यासाठी तुम्हाला समर केअर प्रोडक्ट्स बाजारात मिळतील, पण तुम्ही घरगुती उपायांनीही चमकदार आणि निरोगी त्वचा मिळवू शकता. पुदीना आपल्या आरोग्यासोबतच आपल्या त्वचेसाठी देखील खूप जास्त फायदेशीर (Beneficial) आहे. पुदिन्यात असलेले औषधी गुणधर्म त्वचेला आतून दुरुस्त करतात. विशेष म्हणजे आपण घरचे-घरी पुदिन्यापासून काही फेसपॅक तयार करून चेहऱ्यावर लावू शकता.
उन्हाळ्यात त्वचेला हायड्रेट ठेवणे खूप गरजेचे आहे. यासाठी तुम्ही काकडीची मदत घेऊ शकता. काकडी चेहऱ्यावर लावल्याने काही वेळाने तुमची त्वचा चमकू लागते. पुदीना त्वचेला थंड ठेवू शकतो आणि दीर्घकाळ ताजे ठेवू शकतो. किसलेल्या काकडीचा रस एका भांड्यात ठेवा आणि त्यात पुदिन्याच्या पानांची पेस्ट किंवा रस घाला. हा फेसपॅक चेहऱ्यावर लावा आणि कोरडा राहू द्या. त्यानंतर वीस मिनिटांनी आपला चेहरा थंड पाण्याने धुवा.
पुदिन्याप्रमाणे तुळशीमध्येही औषधी गुणधर्म आहेत. आरोग्याप्रमाणे ते त्वचेसाठीही फायदेशीर मानले जाते. ब्लेंडरमध्ये तुळस आणि पुदिन्याची पाने घालून मिक्स करा. तुम्हाला हवे असल्यास त्यात कडुलिंबाची पानेही टाकू शकता. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि कोरडी राहू द्या. काही वेळाने पाण्याने धुवा. या पद्धतीमुळे त्वचा तजेलदार होईलच, त्याचबरोबर चेहऱ्यावरील पिंपल्सचीही समस्या दूर होण्यास मदत होईल.
उन्हाळ्याच्या हंगामामध्ये दह्याचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी खूप जास्त फायदेशीर आहे. तसेच दही आपल्या त्वचेसाठीही फायदेशीर ठरचे. पुदिन्याची सात ते आठ पाने आणि चार चमचे दही मिक्स करून त्याची बारीक पेस्ट तयार करा. त्यानंतर ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. वीस मिनिटे ही पेस्ट चेहऱ्यावर ठेवा आणि नंतर थंड पाण्याने आपला चेहरा स्वच्छ धुवा.
(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)
संबंधित बातम्या :
Health | उन्हाळ्यात ही 4 खास पेय प्या, फक्त थंडावाच नाही तर अनेक आजारही दूर राहण्यास मदत होईल!
Hair | घामामुळे केस कोरडे आणि निर्जीव होऊ शकतात, हे टाळण्यासाठी या टिप्स फॉलो करा