Skin Care : चेहऱ्यावरील तेज वाढवण्यासाठी ‘हे’ फेसपॅक वापरा, वाचा याबद्दल अधिक !

| Updated on: Jul 15, 2021 | 8:31 AM

आपण त्वचा निरोगी ठेवण्यासाठी नेहमी विविध उपाय ट्राय करतात. निरोगी आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी, विविध सौंदर्य उत्पादनांचा वापर करतो.

Skin Care : चेहऱ्यावरील तेज वाढवण्यासाठी हे फेसपॅक वापरा, वाचा याबद्दल अधिक !
फेसपॅक
Follow us on

मुंबई : आपण त्वचा निरोगी ठेवण्यासाठी नेहमी विविध उपाय ट्राय करतो. निरोगी आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी, विविध सौंदर्य उत्पादनांचा वापर करतो. मात्र, जास्त प्रमाणात सौंदर्य उत्पादनांचा वापर केल्याने आपल्या त्वचेचे तेज कमी होते. यामुळे आपण नेहमी घरगुती उपाय केले पाहिजेत. त्वचेचे तेज वाढविण्यासाठी कोरफडचा रस लिंबाचा रस आणि गुलाब पाणी मिसळा. (Use this face pack to get beautiful face)

हे मिश्रण चेहरा आणि मानेवर लावा. आता 2 ते 3 मिनिटांसाठी हलक्या हातांनी मालिश करा.
रात्री झोपताना याचा वापर करा आणि रात्रभर तसेच ठेवा. आपल्या त्वचेवरील नैसर्गिक चमक वाढत जाईल. कोरफडीचा रस आपली त्वचा बरी करेल. लिंबू नैसर्गिक ब्लीचच्या गुणांसह त्वचेचे पोषण करेल. दररोज याचा वापर करा. आपली इच्छा असल्यास चेहरा, मान तसेच हातावर वापर करा. कारण स्लीव्हलेस परिधान केल्यावर हातांच्या त्वचेचा रंग उडू लागतो.

तेलकट फेस पॅकसाठी काही झेंडूच्या फुलांची पेस्ट तयार करा. यामध्ये एक चमचा दही, अर्धा चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा गुलाब पाणी घाला. सर्व साहित्य एकत्र करून पेस्ट बनवा. मग ते चेहरा आणि मानेला लावा. पॅक कोरडे झाल्यावर कोमट पाण्याने चेहरा चांगला धुवा. आठवड्यातून दोनदा हा पॅक वापरल्याने तेलकट त्वचा सुधारेल. याव्यतिरिक्त, डागदेखील निघून जाण्यास सुरुवात होईल. कॉफीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आढळतात, तसेच यामध्ये अँटी एजिंग गुणधर्म देखील असतात.

ज्यामुळे आपली त्वचा चमकदार बनते आणि चेहर्‍यावरील सुरकुत्याची समस्या दूर होते. हा फेसपॅक आपण आठवड्यातून दोन ते तीन वेळा लावला पाहिजे. सर्वांत अगोरद अर्धी वाटी तांदूळ घ्या आणि ते बारीक करून घ्या. त्यामध्ये ताजे दही घाला ही पेस्ट व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि चेहऱ्यावर 30 ते 40 मिनिटे तसेच ठेवा आणि हा पॅक सुकल्यानंतर चेहऱ्यावर हात फिरवा यामुळे तुमचे स्क्रब देखील होईल. यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा याचा फायदा त्वचेला होईल.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Use this face pack to get beautiful face)