Skin Care : चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी ‘हा’ फेसपॅक वापरा!

| Updated on: Aug 04, 2021 | 5:02 PM

सगळ्यांनाच आपला चेहरा बहरलेला पहायचा असतो. परंतु, जर आपल्या चेहऱ्यावर अगदी लहान वयातच सुरकुत्या पडल्या, तर कदाचित आपणास सकाळी उठून आरशात आपला चेहरा पाहणे देखील आवडणार नाही.

Skin Care : चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी हा फेसपॅक वापरा!
फेसपॅक
Follow us on

मुंबई : सगळ्यांनाच आपला चेहरा बहरलेला पहायचा असतो. परंतु, जर आपल्या चेहऱ्यावर अगदी लहान वयातच सुरकुत्या पडल्या, तर कदाचित आपणास सकाळी उठून आरशात आपला चेहरा पाहणे देखील आवडणार नाही. म्हणूनच, आपणही आपल्या त्वचेची विशेष काळजी घेतली पाहिजे. ज्यामुळे आपल्या चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या पडणार नाहीत. (Use this face pack to reduce wrinkles on the face)

जर आपल्याला चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करायच्या असतील तर आपण काही घरगुती उपाय हे केले पाहिजेत. ज्यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या जाण्यास मदत होते. चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी आपण कोरफड, गुलाब पाणी, बेसन पीठ, हळद आणि मुलतानी मातीचा फेसपॅक घरी तयार केला पाहिजे. वरील सर्व साहित्य प्रत्येकी एक-एक चमचा घ्या. त्यामध्ये तीन चमचे गुलाब पाणी मिक्स करा. ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर लावा. त्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा.

हा फेसपॅक आपण आठ दिवसातून दोन वेळ आपल्या चेहऱ्याला लावल्याने चेहऱ्याच्या सर्व समस्या दूर होण्यास मदत मिळते. चेहऱ्यावरील सुरकुत्या घालवण्यासाठी चंदन फायदेशीर असते. चंदनाचा लेप चेहऱ्याला लावल्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या जाण्यास मदत होते. चंदनातील अॅन्टीबॅक्टेरीयल तत्त्व हे चेहऱ्यावर परिणाम करणारे बॅक्टेरीया नष्ट करतात आणि आपला चेहरा उजळवतात.

तांदळाची पेस्ट चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यास मदत करते. यासाठी एका भांड्यात एक चमचा तांदळाचे जाडसर पीठ आणि दोन चमचे गुलाब पाणी घेऊन त्याची पेस्ट तयार करुन घ्या. ही पेस्ट चेहऱ्यावर आणि हातावर स्क्रबप्रमाणे लावा आणि काहीवेळाने धुवून टाका. चेहऱ्यावरील सुरकुत्या गायब करण्यासाठी दूध अत्यंत फायदेशीर आहे. रात्री झोपण्याच्या अगोदर आपल्या चेहऱ्याला गायीचे कच्चे दूध लावा आणि रात्रभर तसेच ठेवा. यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर होण्यास मदत होते.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!

Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..

(Use this face pack to reduce wrinkles on the face)