मुंबई : चमकदार त्वचा मिळण्यासाठी महिला पार्लरमध्ये जाऊन विविध उपचार घेतात. त्याचा परिणाम काही दिवसांपर्यंत दिसून येतो. मात्र, त्यानंतर त्वचा निर्जीव आणि काळपट दिसू लागते. त्यामध्येही सध्याच्या धावपळीमध्ये महिलांना त्वचेकडे जास्त लक्ष देणे शक्य होत नाही. यामुळे त्वचा अधिकच खराब होत जाते. (Watermelon and honey face pack is beneficial for the skin)
तजेलदार त्वचा मिळवण्यासाठी आपण काही घरगुती उपाय केले पाहिजेत. ज्यामुळे आपली त्वचा सुंदर दिसण्यास मदत होते. आपल्या सर्वांना माहीती आहे की, कलिंगड खाणे आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे. कलिंगड खाल्याने आरोग्यासाच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. मात्र, तुम्हाला हे माहीती आहे का? की, कलिंगड फक्त आरोग्यासाठीच नाहीतर आपल्या त्वचेसाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे.
टॅन काढून टाकण्यासाठी कलिंगड एक उत्तम नैसर्गिक उपाय आहे. हा पॅक घरी तयार करण्यासाठी एका वाडग्यात 2 चमचे कलिंगडचा लगदा घ्या आणि त्यात 2 चमचे कच्चा मध मिक्स करा. हे सर्व चेहऱ्यावर तसेच गळ्यावर लावा. ते 15-20 मिनिटे सोडा. त्यानंतर ताजे पाण्याने धुवा. आपण आठवड्यातून दोनदा त्वचेच्या काळजीसाठी मध आणि कलिंगडचा हा फेसमास्क वापरू शकतो. ज्यामुळे त्वचेच्या समस्या दूर होण्यास मदत मिळते.
कलिंगडमध्ये अँटिऑक्सिडेंट्स, जीवनसत्त्वे बी, सी आणि डी मोठ्या प्रमाणात आढळतात. जे आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. म्हणून उन्हाळ्यात कलिंगड खाण्याचा सल्ला डाॅक्टर देतात. कलिंगडमध्ये लोह, झिंक, फायबर आणि प्रोटीनसोबत मायक्रोन्यूट्रियंटस असतात. 4 ग्रॅम कलिंगडमध्ये फक्त 23 कॅलरीज असतात. शक्यतो कलिंगड खाल्ल्यानंतर कलिंगडाचे साल आपल्या चेहऱ्यावर चोळले पाहिजेत.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Winter Diet | थंडीच्या दिवसांत रिकाम्या पोटी ‘या’ पदार्थांच्या सेवनाने राहील शरीर तंदुरुस्त!https://t.co/Znr5WfzLhp#Winter #diet #Food #health
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 11, 2020
(Watermelon and honey face pack is beneficial for the skin)