मुंबई : सुंदर आणि निरोगी त्वचा आपल्याला हवी असेल तर आपण काही घरगुती उपाय करून त्वचा सुंदर आणि निरोगी मिळू शकतो. विशेष म्हणजे अगदी कमी दिवसांमध्ये आपल्याला आपल्या चेहऱ्याच्या त्वचेमध्ये फरक जाणवेल. हे फेसपॅक घरी तयार करण्यासाठी अत्यंत सोप्पे देखील आहेत. यासाठी आपल्याला जास्त वेळ देखील लागत नाही. (Watermelon, cucumber and curd face pack is beneficial for the face)
कलिंगड, काकडी आणि दह्याचा फेसपॅक घरचे-घरी तयार करण्यासाठी आपल्याला कलिंगडचे दोन काप, अर्धी काकडी आणि चार चमचे दही लागणार आहे. काकडी आणि कलिंगडची बारीक पेस्ट तयार करून घ्या आणि त्यामध्ये दही मिक्स करा. ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यासह मानेवर लावा. साधारण वीस मिनिटे ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर ठेवा आणि त्यानंतर थंड पाण्याने आपला चेहरा धुवा.
ही पेस्ट आपण साधारण आठ दिवसातून तीन ते चार वेळा आपल्या चेहऱ्याला लावली पाहिजेत. ज्यामुळे आपल्या चेहऱ्याच्या समस्या दूर होण्यास मदत मिळते. केळी, कलिंगड, आंबा आणि कोरफडचा फेसपॅक आपल्या चेहऱ्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. यामुळे आपली त्वचा हेल्दी आणि चमकदार होण्यास मदत होते. हा फेसपॅक चेहऱ्यावर लावण्यासाठी अर्धी केळी, दोन काप कलिंगड, एक काप आंबा आणि तीन चमचे कोरफडीचा गर घ्या.
यासर्वांची चांगली पेस्ट तयार करा आणि चेहऱ्यासह मानेवर लावा. साधारण एक तास ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर ठेवा आणि त्यानंतर चेहरा कोमट पाण्याने धुवा. कलिंगडमध्ये अँटिऑक्सिडेंट्स, जीवनसत्त्वे बी, सी आणि डी मोठ्या प्रमाणात आढळतात. जे आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. म्हणून उन्हाळ्यात कलिंगड खाण्याचा सल्ला डाॅक्टर देतात. कलिंगड हे आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Winter Diet | थंडीच्या दिवसांत रिकाम्या पोटी ‘या’ पदार्थांच्या सेवनाने राहील शरीर तंदुरुस्त!https://t.co/Znr5WfzLhp#Winter #diet #Food #health
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 11, 2020
(Watermelon, cucumber and curd face pack is beneficial for the face)