मुंबई : दही आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. वजन कमी करण्यापासून रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यापर्यंत, दह्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का? की, दही आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे. अनेक सौंदर्य उत्पादनांमध्ये दह्याचा वापर देखील केला जातो. दह्यामुळे त्वचेच्या आणि केसांच्या अनेक समस्या दूर होतात. (Yogurt is extremely beneficial for skin and hair)
स्वच्छ त्वचा – आपल्यापैकी बरेचजण त्वचेच्या समस्यांमुळे ग्रस्त असतात. जसे की त्वचेचा असमान टोन किंवा पिग्मेंटेशन, मुरुमांचे चट्टे इ. या सर्व समस्या दूर करण्यासाठी दही फायदेशीर आहे. यामुळे त्वचा चमकदार होण्यास मदत होते. जास्त सूर्यप्रकाशामुळे होणाऱ्या त्वचेच्या नुकसानावर देखील दही वापरले जाऊ शकते.
मुरुमाला प्रतिबंध करते – दही केवळ तुमची त्वचा गुळगुळीत आणि चमकदार बनवत नाही, तर त्यात काही औषधी गुणधर्म देखील आहेत. जे मुरुम कमी करण्यास मदत करतात. हे बॅक्टेरियाविरोधी आणि बुरशीविरोधी गुणधर्मांनी देखील भरलेले आहे. हे संक्रमण नियंत्रणात ठेवून पुरळ कमी करण्यास मदत करते.
डार्क सर्कल कमी करते- दह्यामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. जे डार्क सर्कलपासून मुक्त होण्यास मदत करतात. रोज रात्री झोपण्यापूर्वी थोडे दही लावा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी धुवा.
तरुण दिसण्यासाठी – व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्स तुमच्या त्वचेसाठी फायदेशीर असतात. हे त्वचेची वृद्धत्व प्रक्रिया मंदावते. हे तुम्हाला तरुण दिसणारी त्वचा देते.
केसांच्या वाढीस प्रोत्साहन देते – दह्यामध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स मुक्त रॅडिकल्सशी लढतात. आठवड्यातून एकदा दही लावल्याने केसांच्या वाढीस मदत होते. हे केस निरोगी, मऊ आणि चमकदार ठेवते. त्यात असलेले व्हिटॅमिन बी 5 आणि डी केस गळणे नियंत्रित करू करतात.
सनबर्न समस्या – जर तुम्हाला सनबर्नची समस्या असेल तर दही तुम्हाला मदत करू शकते. दही अँटीऑक्सिडंट्स समृद्ध आहे. दही जळजळ शांत करण्यास आणि आपली त्वचा मॉइस्चराइझ करण्यास मदत करते.
कोंड्यावर नियंत्रण – जर तुम्ही डोक्यातील कोंड्यामुळे त्रस्त असाल तर तुम्ही केसांना दही लावले पाहिजे. दह्यामुळे केसांमधील कोंडा दूर जाण्यास मदत होते. दहीमध्ये अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. जे केवळ केसांमधील कोंडाच नाहीतर टाळूला मॉइस्चराइज आणि पोषण देखील देतात.
(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Milk | गाय की म्हैस, आपल्या आरोग्यासाठी कोणते दूध अधिक फायदेशीर? जाणून घ्या..
Hair Care | थंडीच्या दिवसांत रुक्ष केसांच्या समस्येमुळे हैराण? मग ‘हे’ हेअर मास्क नक्की ट्राय करा!https://t.co/R06JFAcxU4#HairMask #HairCare #beautytips
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 29, 2020
(Yogurt is extremely beneficial for skin and hair)