मुंबई : देशामध्ये परत एकदा कोरोनाने थैमान घातले आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्वाचे आहे. कोरोनापासून दूर राहिचे तर आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणे महत्वाचे आहे. रोगप्रतिकारक शक्ती चांगली करण्यासाठी आणि कोरोनापासून दूर राहण्यासाठी आज आम्ही तुम्हाला एक खास पेय सांगणार आहोत. ज्यामुळे तुमची रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहिल…(Beet and carrot juice are beneficial for boosting the immune system)
बीट शरीरातील हिमोग्लोबिन वाढवतात आणि रक्त शुद्ध करतात. त्यात आढळणारे अँटिऑक्सिडेंटस शरीराला रोगांशी प्रतिकार करण्याची क्षमता देतात. याबरोबरच नायट्रेट, बेटेन, मॅग्नेशियम, फॉस्फरस, सोडियम, व्हिटामिन बी 1, बी 2 आणि सी हे तत्व बीटाचे औषधी गुणधर्म वाढवतात. तर गाजरामध्ये गाजरात व्हिटॅमिन ए, बी, सी, डी, ई, जी असतात. त्यामुळे गाजर खाणे शरीरासाठी फायद्याचे आहे. यामुळे अनेक आजारांवर मात करता येते.
गाजर खाल्ल्याने हाडे निरोगी राहण्यापासून ते डोळ्यांचा कमकुवतपणा देखील दूर होतो. गाजरात 95 टक्के पाण्याचे प्रमाण असते. ज्यामुळे गाजर खाण्यामुळे तुम्ही हायड्रेट राहता.
रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवण्यासाठी बीट आणि गाजरचा रस घेणे खूप चांगले आहे. बीटमध्ये कॅरोटीन आणि अल्फा यासारखे पौष्टिक पदार्थ असतात. ते आपल्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहेत.
बीट आणि गाजरचा रस बनवा आणि त्यात थोडासा लिंबाचा रस मिसळा. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि शरीरात उपस्थित विषारी पदार्थ काढून टाकते. एका गाजरामध्ये अंदाजे 95 % पाणी असतं. शिवाय एका मध्यम आकाराच्या गाजरात जवळजवळ 25 कॅलरिज असतात. ज्यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यासाठी तुमच्या आहारात गाजर असणं अतिशय गरजेचं आहे. गाजरातील फायबर्समुळे तुमचं पोट बराच काळ भरल्यासारखं वाटतं.
गाजरात फायबर्स, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी असे अनेक पोषक घटक असतात. ज्यामुळे तुमच्या रक्तदाब चांगला राहतो. आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी दररोज गाजराचा रस पिणे चांगले असते. यामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम असते, जे शरीरातील पोटॅशियमची कमतरता दूर करते. पोटॅशियम अभावी शरीरात थकवा आणि अशक्तपणा यासारख्या समस्या उद्भवतात.
शरीरात कोलेस्टेरॉलची पातळी वाढत असेल तर आपण बीटच्या रसाचे सेवन करू शकता. यासाठी ते खूप फायदेशीर आहेत. बीटमध्ये मिनरल सिलिका असते. या तत्त्वामुळे शरीर कॅल्शियमला प्रभावी रुपात वापरता येऊ शकते. कॅल्शियम आपल्या दात आणि हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असते.
संबंधित बातम्या :
Immunity Booster | थंडीच्या दिवसांत आवळ्याचा रस आरोग्यवर्धक, इम्युनिटी वाढवण्यासाठी ‘हे’ नक्की ट्राय करा!https://t.co/XPmKiIDsHE#ImmunityBooster #AmlaJuice
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 28, 2020
(Beet and carrot juice are beneficial for boosting the immune system)