मुंबई : शिमला मिरची आपल्या रोजच्या जेवनामधील एक घटक आहे. प्रत्येक घरामध्ये आठवड्यातून एकदा तरी शिमला मिरचीची भाजी होतेच. मात्र, तुम्हाला माहिती आहे का? शिमला मिरची खाणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. शिमला मिरची खाल्ल्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. शिमला मिरचीमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, फायबर, कॅरोटीनोइड समृद्ध असतात जे आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरते. (Bell Pepper Superfood to boost the immune system)
-आपल्या शरीरात लोहाची कमतरता असेल तर आपण शिमला मिरची आहारात दररोज घेतली पाहिजे. त्याचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. त्यात असलेले व्हिटॅमिन सी लोह वाढवण्यास मदत करते. सर्वात मुख्य म्हणजे शिमला मिरची खाल्ल्याने आपल्या शरीरातील अशक्तपणा कमी होतो.
-जरी आपल्याला मधुमेह नियंत्रित करायचा असेल तर, शिमला मिरची आपल्यासाठी उपयुक्त ठरेल. शिमला मिरची रक्तातील साखरेसाठी आवश्यक योग्य पातळी राखते आणि मधुमेहापासून तुमचे रक्षण करते.
-शिमला मिरची खाणे आपल्या त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. शिमला मिरचीमध्ये असलेल्या घटकांमुळे त्वचेसंदर्भात असलेल्या वेगवेगळ्या समस्या दूर होण्यास मदत होते.
शिमला मिरची एंटी-ऑक्सिडेंट, अँटीइन्फ्लेमेटरी घटक आणि सल्फर, कॅरोटीनॉइड लाइकोपीन देखील असते. यामुळे कर्करोगासारख्या आजारांना टाळण्यासही फायदेशीर आहे.
जर आपल्याला गुडघे आणि सांध्यामध्ये समस्या असतील तर शिमला मिर्ची सेवन करणे आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरेल.
संबंधित बातम्या :
Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो
Face Massage | त्वचेसाठी संजीवनी ठरेल ‘फेस मसाज’, वाचा याचे फायदे…
Hair Care | थंडीच्या दिवसांत रुक्ष केसांच्या समस्येमुळे हैराण? मग ‘हे’ हेअर मास्क नक्की ट्राय करा!https://t.co/R06JFAcxU4#HairMask #HairCare #beautytips
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 29, 2020
(Bell Pepper Superfood to boost the immune system)