पेरु खा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवा, वाचा याबद्दल अधिक !

| Updated on: Apr 13, 2021 | 7:57 AM

पेरु हे फळे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पेरू त्वचा, शरीर आणि केसांसाठी खूप चांगले आणि पौष्टिक फळ आहे.

पेरु खा आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवा, वाचा याबद्दल अधिक !
पेरू
Follow us on

मुंबई : पेरु हे फळे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पेरु त्वचा, शरीर आणि केसांसाठी खूप चांगले आणि पौष्टिक फळ आहे. पेरू हा व्हिटॅमिन सीचा मोठा स्त्रोत आहे. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. यामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम आणि लोह देखील भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे बॅक्टेरिया आणि व्हायरसशी लढायला मदत होते. ज्यांना गॅस, अपचन, पोटाचा त्रास आणि बद्धकोष्ठतेची समस्या आहे त्यांनी पेरु खावीत. याशिवाय पेरु रक्त शुद्ध करण्याचे कामही करतात. (Beneficial for boosting Guava immune system)

-पेरुमध्ये फायबर देखील मोठ्या प्रमाणात असते. पेरूच्या दाण्यांमुळे शरीरातील कार्बोहायड्रेट कमी होते. यामुळे वजन कमी करणे सोपे होते. त्यात आढळणारे जीवनसत्त्वे आणि खनिजे यामुळे आपल्याला भूक देखील लागत नाही.

-जर पेरुच्या पानांचा काढा डायबिटीजच्या रुग्णांना सकाळी रिकाम्या पोटी पिण्यास दिला तर, त्यांच्या साखरेची पातळी नियंत्रित होते. ज्यामुळे मधुमेहामुळे होणारे सर्व त्रास दूर होतात.

-दररोज पेरुची पाने खाल्याने कोलेस्टेरॉल देखील कमी होतो. शरीरात रक्त परिसंचरण चांगले राहते. तसेच हृदयविकाराचा झटका आणि ब्रेन स्ट्रोकचा धोका कमी होतो.

-पेरुच्या बियामध्ये प्रथिने अधिक आढळतात. ज्यामुळे शरीरात इन्सुलिनची पातळी कमी होते. टाईप 2 मधुमेहाच्या रुग्णांसाठी पेरु आणि त्याच्या बिया एक चांगला आहार आहे.

-उच्च रक्तदाब असणाऱ्यांना डॉक्टर सहसा पेरु खाण्याचे सांगतात. पेरुच्या बियामध्ये जास्त प्रमाणात पोटॅशियम असते जे रक्त प्रवाह नियंत्रित करते.

-जर आपले केस जास्त प्रमाणात गळत असतील, तर पेरूचा रस केसांच्या मुळांवर लावावा. याने केस गळणे काही दिवसांतच थांबेल. तसेच केस चमकदार आणि जाडही होतील.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

(Beneficial for boosting Guava immune system)