सकाळच्या नाश्त्यामध्ये केळी आणि अंड्याचा समावेश करा, होतील अनेक फायदे !

| Updated on: Jun 01, 2021 | 9:02 AM

निरोगी आणि हेल्दी राहण्यासाठी सकाळचा नाश्ता हा महत्त्वाचा आहे. कारण यातूनच तुम्हाला संपूर्ण दिवसभर काम करण्याची ऊर्जा मिळते.

सकाळच्या नाश्त्यामध्ये केळी आणि अंड्याचा समावेश करा, होतील अनेक फायदे !
केळी आणि अंडी
Follow us on

मुंबई : निरोगी आणि हेल्दी राहण्यासाठी सकाळचा नाश्ता हा महत्त्वाचा आहे. कारण यातूनच तुम्हाला संपूर्ण दिवसभर काम करण्याची ऊर्जा मिळते. त्यामुळे तुमचे शरीर दिवसभर ताजेतवाने राहते. सकाळच्या नाश्त्याला न्याहारी किंवा ब्रेकफास्टही म्हटले जाते. तज्ज्ञांच्या मते सकाळचा नाश्ता अधिक पौष्टिक असावा. यामुळे वजन नियंत्रित ठेवण्यासोबत शरीराला पर्याप्त प्रमाणात ऊर्जा मिळते. याव्यतिरिक्त, सकाळी लवकर नाश्ता केल्याने चयापचय संबंधित फायदे होतात. (Beneficial to eat bananas and eggs for breakfast)

सर्वांना प्रश्न पडतो म्हणजे सकाळच्या नाश्त्यामध्ये नेमके काय घेतले पाहिजे. जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. आपण शक्यतो सकाळच्या नाश्त्यामध्ये दोन केळी आणि दोन अंडी घेतली पाहिजे. कारण केळीमध्ये पोटॅशियम, मूड-रेगुलेटिंग फोलेट, ट्रायटोफन आणि एनर्जाइजिंग कार्ब्स देखील असतात. हे सर्व आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. अंडी आपल्या शरीरासाठी खूप लाभदायी आहेत. तसेच, त्यात अनेक प्रकारचे पोषक घटक आढळतात.

अंडी उच्च गुणवत्तेच्या प्रथिनांचा चांगला स्रोत आहे. अंडी आपल्या स्नायूंच्या तंदुरुस्तीसाठी देखील खूप उपयुक्त आहेत. याव्यतिरिक्त आपल्या रक्तातील साखर नियंत्रित करण्यात, रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यात आणि वजन कमी करण्यास अंडी खूप प्रभावी आहेत.
नाश्तामध्ये अंड्यांचं सेवन केल्यास लवकर वृद्धत्व येत नाही. त्वचा आणि डोळ्यांच्या सभोवतालच्या सुरकुत्या कमी होतात. ज्यामुळे त्वचा बर्‍याच काळापर्यंत तजेलदार राहते.

अंड्यांमध्ये मुबलक प्रमाणत ‘व्हिटामिन डी’ आढळतो, जो तुमच्या हाडांना बळकटी देण्यास फायदेशीर ठरतो. अंडी सर्वोत्तम आणि आरोग्यासाठी उपयुक्त पदार्थांपैकी एक मानली जातात. अंड्यात कॅलरी, प्रथिने, निरोगी चरबी, फोलेट, कॅल्शियम, फॉस्फरस, सेलेनियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 5, व्हिटॅमिन बी 12, व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन बी 6 यासारखे पोषक असतात.

केळ्यामध्ये उच्च फायबर असते. म्हणून केळी खाणे फायद्याचे आहे. केळी खाल्ल्याने बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते आणि शरीर निरोगी राहते. केळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पोटॅशियम असते, जे उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते. यामुळे तुमचे हृदयही मजबूत बनवते. केळ्यांसारख्या उच्च फायबरयुक्त पदार्थांना हृदयरोगाचा धोका कमी करण्यासाठी फायदेशीर मानले जाते.

(टीप : कोणत्याही उपचारापूर्वी डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

संबंधित बातम्या : 

पायांना सतत दुर्गंध येतोय? मग ‘या’ घरगुती टिप्स ट्राय करा नि समस्येतून मुक्त व्हा!

Side Effect | केसांना ब्लीच करताय? सावधान…. वाचा काय परिणाम होऊ शकतो

(Beneficial to eat bananas and eggs for breakfast)