kheera for skin
Image Credit source: Social Media
मुंबई: काकडी एक सुपरफूड आहे ज्यामध्ये 95 टक्के पाण्याचे प्रमाण असते. त्यामुळे याच्या सेवनाने तुमचे शरीर आणि त्वचा हायड्रेटेड राहते. काकडीचा वापर त्वचेवर केल्यास त्वचेची जळजळ कमी होते. आज आम्ही तुमच्यासाठी काकडीचा फेसपॅक घेऊन आलो आहोत. काकडीचा फेसपॅक त्वचेला पौष्टिक ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. यामुळे त्वचेचे लालसरपणापासून संरक्षण होते. हा फेसपॅक लावल्याने तुमची थकलेली आणि निस्तेज त्वचा लगेच ताजेपणाने भरून जाईल, तर चला जाणून घेऊया काकडीचा फेसपॅक कसा बनवायचा.
काकडीचा फेसपॅक बनवण्यासाठी लागणारे साहित्य
- 1 चमचा कोरफड जेल
- 1/4 टीस्पून किसलेली काकडी
काकडीचा फेसपॅक कसा बनवावा?
- काकडीचा फेसपॅक बनवण्यासाठी आधी काकडी घ्या,
- मग ती धुवून किसून घ्या.
- त्यानंतर एका बाऊलमध्ये १/४ चमचा किसलेली काकडी घाला.
- यासोबतच यामध्ये 1 चमचा कोरफड जेल देखील घाला.
- मग तुम्ही या दोन्ही गोष्टी नीट मिसळून पेस्ट तयार करा.
- आता तुमचा काकडीचा फेसपॅक तयार आहे.
काकडीचा फेसपॅक कसा लावावा?
- काकडीचा फेसपॅक लावण्यापूर्वी चेहरा धुवून पुसून घ्यावा.
- त्यानंतर फेसपॅक घ्या आणि आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर चांगले लावा.
- यानंतर तुम्ही ते चेहऱ्यावर सुमारे 15 मिनिटे लावून वाळवून घ्या.
- त्यानंतर साध्या पाण्याच्या साहाय्याने चेहरा धुवावा.
- यामुळे तुम्हाला लगेच ताजेतवाने वाटेल.
(डिस्क्लेमर: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)