Benefits of walnuts: रोज सकाळी रिकाम्या पोटी भिजवलले अक्रोड खाण्याचे फायदे

| Updated on: Dec 20, 2023 | 8:48 PM

Benefits of socked walnuts : दररोज सकाळी उपाशी पोटी जर तुम्ही भिजवलेले अक्रोड खाल्ले तर तुम्हाला याचा दुप्पट फायदा होतो. अक्रोड हे अनेक आजारांवर प्रभावी आहे. अक्रोडमध्ये अनेक महत्त्वाचे पोषकतत्व असतात. आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या असेल तर डॉक्टरांचा सल्ला आधी घ्यावा.

Benefits of walnuts: रोज सकाळी रिकाम्या पोटी भिजवलले अक्रोड खाण्याचे फायदे
walnuts
Follow us on

Benefits of walnuts : ड्रायफ्रुट्समधून शरीराला अनेक पोषक तत्व मिळतात. काजू, बदाम, मनुका आणि खजूर यामध्ये पोषक घटक भरपूर प्रमाणात असतात. आक्रोड हे असे ड्राय फ्रूट आहे जे तुमच्या शरीराला निरोगी बनवण्यासाठी खूप प्रभावी आहे. आक्रोडमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि प्रोटीन्स भरपूर प्रमाणात असतात. चला तर मग जाणून घेऊया आक्रोड खाण्याचे फायदे.

हाडे मजबूत करते

अनेकांना हाडांशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते.अक्रोडमध्ये असलेले अल्फा-लिनोलेनिक अॅसिड तुमची कमकुवत हाडे मजबूत करते. हाडे कमकुवत झाली असतील तर रोज सकाळी आक्रोडचे सेवन करावे. भिजवलेले अक्रोड रिकाम्या पोटी खाल्ल्याने हाडे आणि दात मजबूत होतात.

वजन कमी करण्यास मदत

हिवाळ्यात अनेकांचे वजन वाढते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी अक्रोडचे सेवन करावे. भिजवलेल्या अक्रोडाचे सेवन केल्याने शरीराचे वाढते वजनही नियंत्रित करता येते. अक्रोडमध्ये प्रथिने, फायबर आणि जीवनसत्त्वे भरपूर असतात ज्यामुळे भूक कमी होते आणि शरीराला ऊर्जा मिळते. याशिवाय, त्यात कमी कॅलरी सामग्री आहे जी वजन नियंत्रित करते.

हे सुद्धा वाचा

त्वचा चांगली राहते

हिवाळ्यात लोकांची त्वचा कोरडी पडते, त्यामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. जर तुम्हाला तुमची त्वचा मऊ आणि कोमल ठेवायची असेल, तर रोज अक्रोड खा. यामुळे तुम्हाला सुंदर आणि निरोगी त्वचा मिळेल.

मेंदूसाठी फायदेशीर

ज्यांची स्मरणशक्ती कमकुवत आहे किंवा विसरण्याची समस्या आहे त्यांनी रोज अक्रोडाचे सेवन करावे. अक्रोडमध्ये असलेले व्हिटॅमिन ई, ओमेगा 3 फॅटी अॅसिड आणि अँटीऑक्सिडंट्स यांसारखी पोषकतत्त्वे तुमचा मेंदू निरोगी ठेवण्यास मदत करतात. अक्रोड खाल्ल्याने मेंदूतील रक्ताभिसरण वाढते ज्यामुळे ऑक्सिजन आणि पोषक तत्त्वे मेंदूपर्यंत सहज पोहोचतात आणि मेंदूचे आरोग्य सुधारते.

कर्करोगाचा धोका कमी होतो

अक्रोडाचे सेवन केल्याने कर्करोगापासून बचाव होतो. यामुळे प्रोस्टेट कॅन्सर, कोलोरेक्टल कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर यांसारख्या आजारांचा धोका कमी होऊ शकतो. अक्रोडमध्ये पॉलीफेनॉल एलाजिटानिन्स आढळतात जे तुम्हाला कर्करोगापासून वाचवण्यास मदत करतात.

सकाळी भिजवलेले अक्रोड खाल्ल्याने आरोग्याला जबरदस्त फायदा होतो. नाश्त्यामध्ये अक्रोड खाल्ल्याने तुम्हाला दिवसभर एनर्जी मिळते.रोज सकाळी रिकाम्या पोटी ५-६ अक्रोड खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात.