त्वचेच्या कोरडेपणापासून ते पुरळांपर्यंत बेसनाचे हे फायदे तुम्हाला माहितीयेत का?

| Updated on: Feb 24, 2022 | 2:32 PM

त्वचेसाठी बेसनाचे पीठ खुपच गुणकारी मानले जाते नितळ त्वचेसाठी बेसनाच्या पीठाचा फार पूर्वीपासून वापर केला जात आहे. यामुळे त्वचेच्या अनेक समस्या दूर होतात, परंतु प्रत्येक समस्येसाठी ते वापरण्याची पद्धतही वेगळी असते.

त्वचेच्या कोरडेपणापासून ते पुरळांपर्यंत बेसनाचे हे फायदे तुम्हाला माहितीयेत का?
Follow us on

अनेक जणांकडून आपणास अंघोळीसाठी साबनाचा कमी प्रमाणात वापर करुन बेसन पीठाचा जास्त उपयोग करण्याचा सल्ला दिला जात असतो. त्वचेसाठी बेसन पीठ अत्यंत फायदेशीर मानले जाते. यामुळे छोट्या मोठ्या सर्व त्वचेच्या समस्या (skin problem) आरामात दुर होत असतात. बेसन पीठ हे हरभरा डाळीपासून तयार होत असते. हे कर्बोदक व प्रथिनांचे उत्कृष्ट स्त्रोत आहे आणि त्वचेसाठी नैसर्गिक ‘क्लीन्सर’ मानले जाते. बेसनाचा वापर त्वचेवर केल्याने अनेक समस्यांपासून आराम मिळतो. हे त्वचा डिटॉक्स करण्याचे काम करते. बेसनामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आढळतात, जे त्वचेला अनेक समस्यांपासून दूर ठेवतात. बेसन कोरडेपणापासून (dryness) पुरळांपर्यंतच्या (pimples) सर्व समस्या दूर करतात.

कोरडेपणाची समस्या

तुमची त्वचा मुळात कोरडी असेल अन्‌ हवामानानुसार तुम्हाला अधिकच कोरडेपणा जाणवत असल्यास त्यावर बेसन पीठ अत्यंत गुणकारी ठरत असते. बेसनाचे पीठ दुधाच्या मलईत मिसळून वापरावे. क्रीम आणि बेसनचा फेस पॅक त्वचेला ‘हायड्रेट’ ठेवतो. त्वचेला मुलायम बनवतो यामुळे आपला रंगही उजळतो. बेसन आणि मलईची पेस्ट तयार करून चेहऱ्यावर लावा आणि कोरडे होऊ द्या. काही वेळाने चेहरा पाण्याने धुवा.

तेलकट त्वचेपासून सुटका

त्वचेचा तेलकटपणा दुर करुन तिला स्वच्छ करण्यासाठी बेसनाचे पीठ दह्यात मिसळून त्वचेवर लावावे. हे त्वचेमध्ये अतिरिक्त सीबम तयार होण्यास प्रतिबंध करते. यामुळे त्वचेचा तेलकटपणा खूप कमी होतो. हा पॅक चेहऱ्यावर लावण्यापूर्वी चेहरा पाण्याने धुवा आणि स्वच्छ कपड्याने पुसून टाका. त्यानंतर हा पॅक लावा. कोरडे झाल्यानंतर चेहरा थंड पाण्याने धुवा.

मुरुम होतात दूर

चेहरा पुरळांनी भरला असेल व यामुळे तुमची सुंदरता कमी होत असेल तर बेसन यासाठी खूप उपयुक्त आहे. मुरुमांपासून बचाव करण्यासाठी एका भांड्यात बेसन घेऊन त्यात काकडीची पेस्ट चांगली मिसळावी. ही पेस्ट मानेपासून चेहऱ्यापर्यंत चांगली लावा. साधारण 20 मिनिटांनी चेहरा धुवा. यामुळे मुरुमांची समस्या दूर होईल आणि चेहऱ्याची चमक वाढेल.

निस्तेज त्वचेची समस्या

चेहरा मृत त्वचेच्या पेशींनी व्यापल्याने त्वचा निस्तेज झालेली असते. त्यावर उपाय म्हणून बेसनामध्ये गुलाबपाणी मिसळा. तसेच थोडी हळद आणि मुलतानी माती मिक्स करून मानेपासून चेहऱ्यापर्यंत लावा. त्वचेला हलक्या हातांनी मसाज करा. साधारण 15 मिनिटांनी चेहरा सामान्य पाण्याने धुवा.

संबंधित बातम्या

‘ब्रेन स्ट्रोक’ची लक्षणे दिसताच काळजी घ्या, उशीर झाल्यास जीवावर बेतेल!

वंध्यत्वाची समस्या? हा ओटीपोटाचा क्षयरोग तर नाही… ही आहेत लक्षणे

Yoga Poses : चेहऱ्याची चमक वाढवण्यासाठी ‘हे’ 5 योगासन नियमित करा!