बेसन पीठ केसांना लावण्याचे ‘हे’ फायदे वाचा 

| Updated on: Mar 24, 2021 | 1:56 PM

बेसन पीठ आपल्या चेहऱ्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. बहुतेक लोकांना हे माहित आहे.

बेसन पीठ केसांना लावण्याचे हे फायदे वाचा 
केळीमध्ये भरपूर पोषक घटक असतात. जे आपल्या केसांना आश्चर्यकारक फायदे देतात. मधात अँटी-ऑक्सीडंट्स भरपूर असतात. जे केस चमकदार करतात. उन्हाळ्यात केळी आणि मधाचा पॅक तयार करा आणि केसांना लावा. यामुळे केस कोरडी होत नाहीत.
Follow us on

मुंबई : बेसन पीठ आपल्या चेहऱ्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. बहुतेक लोकांना हे माहित आहे. परंतु फारच थोड्या लोकांना माहिती आहे की, ज्याप्रमाणे त्वचेला बेसन पीठ लावणे चांगेल आहे त्यापेक्षाही अधिक केसांना बेसन पीठ लावणे फायदेशीर आहे. बेसन पीठाचा हेअर मास्क 2 ते 3 वेळा लावल्यास तुम्हाला केसांमध्ये बराच फरक जाणवेल. बेसन पीठाचा हेअर मास्क लावल्याने केस गळती कमी होते. केसांची पातळपणा दूर होतो. चला तर मग जाणून घेऊयात बेसन पीठाचा हेअर मास्क कसा तयार करायचा. (Besan flour is beneficial for hair)

एक वाटी बेसन

-दोन व्हिटॅमिन-ई कॅप्सूल

-दोन चमचे कोरफड जेल

-एक चमचे मोहरीचे तेल

-एक ते दीड कप पाणी

-हे सर्व पदार्थ एकत्र मिक्स करा आणि केसांना 30 ते 40 मिनिटांसाठी लावा. यानंतर पाण्याने शॅम्पू लावून केस धुवा. हा हेअर मास्क साधारण आठवड्यातून 2 ते 3 वेळा लावा. यामुळे केस गळतीची समस्या कायमची तुमची दूर होईल .

-आठवड्यातून किमान दोनवेळा आपण नियमितपणे आपले केस धुवावेत. यामुळे केस आणि स्काल्पमध्ये जमा होणारी घाण निघून जाईल. जर आपले केस अधिक तेलकट असतील, तर आपण दररोज आपले केस धुतले पाहिजेत.

-घाई घाईत आपण ड्रायरची हिट वापरून केस कोरडे करता, ज्यामुळे केस कमकुवत होतात. ओल्या केसांना कोरड्या टॉवेलने किंवा मोकळ्या हवेत वाळवा. ओले केस कधीच कंगवा वापरून विंचरू नका. केस चांगले कोरडे झाल्यावर त्यावर तेल लावा आणि मसाज करा.

-केसांना तेल लावल्यानंतर आपण ते कोमट पाण्याने स्वच्छ धुतले पाहिजे. हे लक्षात ठेवावे की जास्त गरम पाणी वापरल्याने आपल्या केसांमध्ये कोरडेपणा उद्भवू शकतो. नेहमी कोमट पाण्याने कुरळे केस धुवावे

संबंधित बातम्या : 

Skin Care | चेहऱ्यावर चुकूनही लावू नका ‘या’ गोष्टी, अन्यथा होऊ शकते त्वचेचे नुकसान!

Dieting Side Effects | डाएटिंग करताय? ‘ही’ लक्षणे दिसताच त्वरित थांबणे ठरेल फायदेशीर!

(Besan flour is beneficial for hair)