मुंबई : आपण सगळ्यांनी आपल्या जीवनात कधी ना कधी पोटात सूज अथवा गॅस (Gas Problem) झाल्याचा त्रास होतो. पोट फुगणे म्हणजेच गॅस एक सामान्य अपचनाची समस्या आहे, जी अनेकदा काही वेळेतच बरी होते तर बऱ्याचदा आपोआप बरी होते. मात्र याचे प्रमाण वाढले तर ती त्रासदायक ठरू शकते. योग्य डाएट रूटीन फॉलो न करणे, वेळेवर जेवण न करणे, अधिक प्रमाणात तेलकट पदार्थ खाणे यांसारख्या सवयींमुळे गॅसची समस्या निर्माण होत असते.
काही औषधांच्या मदतीने सुध्दा यावर आराम मिळवता येतो पण तो तात्पुरत्या स्वरूपाचा असू शकतो. कायमस्वरूपी किंवा अधिक काळासाठी आराम मिळविण्यासाठी आयुर्वेद हा एक उत्तम पर्याय आहे. आपल्या स्वयंपाक घरात अगदी सहज उलब्धत असणाऱ्या अनेक औषधी वनस्पती पोटातील सूज किंवा गॅसच्या समस्येवर आराम देण्यात मदत करू शकतात. इथे काही औषधी वनस्पती सांगत आहोत ज्यांचा तुम्ही तुमच्या आहारात वापर करू शकता.
ज्यांना गॅसची समस्या अधिक प्रमाणात सतावत असते त्यांच्यासाठी हि एक औषधी वनस्पती आहे. कोथिंबीर ही जेवण शिजविण्यासाठी सर्वात जास्त वापरली जाणारी औषधी वनस्पती आहे. हि वनस्पती डायरूटिक आहे.पाणी तसेच मिठाच्या अनेक समस्या ही वनस्पती दूर करते
जिरे हा एक मसाल्याचा पदार्थ आहे, जो प्रत्येक भारतीयाच्या स्वयंपाक घरात अगदी सहज उलब्धत असतो. आयुर्वेदानुसार, जिरे हे पाचक रसांना उत्तेजित करत असते. जिरे सेवन केल्याने ऍसिडीटी आणि अपचनाच्या समस्यांवर सुध्दा आराम मिळविता येतो.
पोटाच्या समस्यांवर आराम मिळविण्यासाठी आयुर्वेदात तुळशीचा वापर हजारो वर्षांपासून केला जात आहे. तुळशीच्या पानांचा अर्क गैस्ट्राइटिसने पीडित उंदरामध्ये गैस्ट्रिक म्यूकोसाची सूज कमी करण्यासाठी उपयोगी ठरते. अशातच जर गॅसची समस्या असलेल्या एखाद्या व्यक्तीने तुळशीच्या पानांचे सेवन केले तर गैस्ट्राइटिसच्या समस्येवर आराम मिळून हि समस्या पूर्वीपेक्षा कमी होते.
पोटाशी संबंधित समस्या असेल तर बडीशोप एक चांगला आयुर्वेदिक उपचार ठरेल. हे फक्त सूज आलेल्या मांसपेशीना आरामच देत नाही तर ब”द्ध”कोष्ठतेच्या समस्येवर सुध्दा आराम मिळतो. याच्या बिया पोट आणि आतड्यांच्या मांसपेशीवर चांगला प्रभाव पाडतात. ज्यामुळे ब”द्ध”कोष्ठता आणि एसिड रिफ्लक्स मुळे होणाऱ्या गॅसवर आराम मिळायला खूप जास्त मदत होते.
थंडीच्या दिवसांत पोटाशी संबंधित अनेक समस्या सतावत असतात. या समस्यांवर आराम मिळविण्यासाठी शेपूचे सेवन अतिशय फायदेशीर मानले गेले आहे. प्रत्येक पाने असलेल्या शेपूमध्ये एंटीइंफ्लेमेट्री प्रभाव दिसून येतात. जे तुम्हाला आरामदायक जाणीव करून देतात.
हि एक हर्बल चहा त्यांच्यासाठी उत्तम आहे, जे गैस्ट्रिक समस्यांनी ग्रासलेले आहेत. हि पाने गैसेट्राइटिस सारखी सूज कमी करण्यासाठी मदत करते, तसेच अल्सरमध्ये देखील खूप आराम मिळतो. पाचनाची समस्या प्रभावीपणे कमी करण्यासाठी एक कप गरम कैमोमाइल चहा दररोज पिणे आवश्यक आहे. याने खूप आराम मिळतो.
जेवल्यानंतर लगेच ज्यांना पोट फुगण्याची समस्या असल्याची तक्रार असते, त्यांनी पुदिन्याचे सेवन केले पाहिजे. हि एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती पोटात गॅसचा त्रास होत असल्यास त्याला नियंत्रित करते.
इथे सांगितलेली सर्व औषधी वनस्पती चांगले परिणाम देणाऱ्या आहेत. मात्र हे गरजेचे नाही की पोट फुगणे किंवा गॅसची समस्या असल्यास याचे सेवन सगळ्यांना फायदेशीर ठरेल.यासाठी इथे सांगितलेले आयुर्वेदिक उपचार करण्याआधी आपल्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.
इतर बातम्या :