मुंबई : जर तुम्हीही वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहात तर आजच आपल्या आहारामध्ये मेथीच्या दाण्यांचा समावेश करा. यामुळे तुमचे वजन कमी होण्यास मदत होईल. मेथीच्या दाण्यांमध्ये पुष्कळ पौष्टिक गुणधर्म असतात त्यामुळे आपली चरबी कमी होते. दररोज 10 ग्रॅम मेथीचे सेवन केले, तर शरीरावरची चरबी कमी होण्यास मदत होते. मेथीच्या दाण्यांमध्ये विद्रव्य फायबर आणि ग्लूकोमोनास फायबर असते. (Body fat is increasing during Corona period so follow these tips)
डार्क चॉकलेट देखील वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. चॉकलेटमध्ये बरेच पौष्टिक घटक आढळतात, विशेषत: डार्क चॉकलेट, ज्यामध्ये भरपूर कोको आणि फायबर असतात. डार्क चॉकलेटमध्ये झिंकची मात्रा सर्वाधिक आहे, जी शरीराचे 300 एन्झाइम्स सक्रिय करते. तसेच, चयापचय वाढवण्याचे काम करते. याव्यतिरिक्त, चॉकलेटमध्ये लोह, मॅग्नेशियम, तांबे, मॅंगनीज, पोटॅशियम, फॉस्फरस आणि सेलेनियमची मात्रा देखील भरपूर असते.
प्रथिनेयुक्त बदाम आपले स्नायू तयार करण्यात मदत करतात. यासह बदाममध्ये आढळणारे फॅट चांगले आणि निरोगी असते, जे आपल्या शरीराचे बॉडी मास इंडेक्स म्हणजे बीएमआय राखण्यास मदत करते. यामुळे पोटाच्या आसपासची चरबी कमी होते. जर आपले पोट देखील बाहेर येत असेल तर आपल्या डाएटमध्ये मूठभर बदामाचा समावेश करा. बदाम भूक नियंत्रित करण्यास खूप मदत करते.
वाढलेले वजन कमी करण्यासाठी आहारात जास्तीत-जास्त प्रमाणात हिरव्या भाज्या घ्या. यामुळे आपले वजन कमी होण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी तसंच आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी आहारामध्ये हिरव्या भाज्यांचा समावेश आवर्जून करावा. वजन नियंत्रणात आणण्यासाठी भाज्या देखील महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. हिरव्या भाज्यांच्या सेवनामुळे शरीराला मोठ्या प्रमाणात पोषण तत्त्वांचा पुरवठा होतो आणि शरीरातील कॅलरीज् देखील कमी होतात.
संबंधित बातम्या :
Skin Care Tips | लग्न करताय? ना ब्यूटी पार्लर, ना ट्रिटमेंट, ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा ग्लो!
Eczema Myth | ‘एक्झिमा’ आजाराबद्दल लोकांमध्ये संभ्रमाची स्थिती, जाणून घ्या या मागचं पूर्ण सत्य…#eczema | #Health | #skincare | #skincareproducts https://t.co/azKyegZj0a
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 26, 2021
(Body fat is increasing during Corona period so follow these tips)