नात्यामध्ये कटुता येणं ही सामान्य गोष्ट आहे. प्रत्येक नात्याला चांगल्या आणि वाईट प्रसंगातून जावं लागतं. सुरुवातीच्या काळात रिलेशनशिप आणि रोमान्समध्ये मर्यादा नसते. पण काही गेल्यावर नातं जेव्हा जुनं होतं. तेव्हा मॅच्युअरीटी येते. त्यानंतर पूर्वीसारखा स्पार्क राहत नाही. कदाचित त्यामुळेच दोन्ही पार्टनर एकमेकांना चांगले ओळखत असावेत म्हणून असं होत असावं. एकमेकांच्या चांगल्या वाईट गोष्टींचा परिचय चांगला झाल्यानेही त्याचाही परिणाम असावा. नात्यात पुन्हा जुनाच स्पार्क आणण्यासाठी एक नवीन फॉर्म्युला सध्या ट्रेंड करत आहे. 2:2:2 असा हा फॉर्म्युला आहे. काय आहे हा फॉर्म्युला? त्याने नातं कसं सुधारतं? यावर टाकलेला हा प्रकाश.
2:2:2 फॉर्म्युला कपलसाठी प्रेम मजबूत ठेवण्याची एक पद्धत आहे. या फॉर्म्युल्याला कपल्स सर्वाधिक पसंत करतात. जे कपल्स बिझी लाइफ जगतात त्यांच्यासाठी हा फॉर्म्युला अत्यंत चांगला आहे. म्हणजे वर्किंग कपल्ससाठी हा फॉर्म्युला सर्वात बेस्ट आहे. या फॉर्म्युल्यामुळे नात्याता गोडवा राहतो. एकमेकांवरचा विश्वास वाढतो.
या सिंपल फॉर्म्युल्याच्या मदतीने अनेक कपल्सच्या विसंवाद आलेल्या आणि बोअरिंग नात्यात एक नवीन ऊर्जा निर्माण झाली आहे. हे लोक पुन्हा एकदा नव्यानेच भेटलेल्या कपल्स सारखे फिल करत आहेत. 2:2:2 फॉर्म्युल्यामुळे या लोकांना एकमेकांसोबत दिवस घालवण्यासाठी पुरेसा वेळ मिळत आहे. त्यांच्या उत्पन्नावर काहीच परिणामही होत नाहीये. या पद्धतीमुळे म्हणा किंवा तंत्रामुळे जोडप्यांचं नातं घट्ट होताना दिसत आहे.