आरोग्यासाठी वांगं एकदम बेस्ट! वांग्याचे फायदे

| Updated on: Feb 19, 2023 | 5:29 PM

वांगीची भाजी आणि त्याचे पदार्थ जगभर खाल्ले जातात. वांग्यात आरोग्याची अनेक रहस्ये दडलेली असतात.

आरोग्यासाठी वांगं एकदम बेस्ट! वांग्याचे फायदे
Brinjal benefits
Image Credit source: Social Media
Follow us on

वांगी ही एक अतिशय सामान्य भाजी आहे, परंतु काही लोकांना त्याची चव आवडत नाही. मात्र वांगीची भाजी आणि त्याचे पदार्थ जगभर खाल्ले जातात. त्याचा रंग हलका हिरवा, जांभळा आणि पांढरा असतो. वांग्यात आरोग्याची अनेक रहस्ये दडलेली असतात, म्हणूनच त्याचा दैनंदिन आहारात समावेश अवश्य करावा. जर तुम्हाला या शानदार भाजीचे फायदे माहित असतील तर तुम्ही ती खाण्यास कधीही नकार देऊ शकणार नाही.

वांगी हे पोषक तत्वांचे पॉवर हाऊस मानले जाते, त्यात कॅलरीज खूप कमी आढळतात, तसेच ते व्हिटॅमिन्स, फायबर, मॅग्नेशियम, नियासिन आणि मॅग्नेशियमने परिपूर्ण असते. जे लोक हे नियमितपणे खातात त्यांना आरोग्यासाठी बरेच फायदे असतात.

वांगीमध्ये भरपूर प्रमाणात अँटी ऑक्सिडेंट गुणधर्म असतात, जे फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या नुकसाना पासून आपल्या शरीराचे रक्षण करतात आणि अनेक गंभीर आजारांचा धोका कमी करतात.

वांगीमध्ये कॅलरीजचे प्रमाण खूप कमी असते, जे वजन आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यास तसेच हृदय निरोगी ठेवण्यास मदत करते, अशा प्रकारे हृदयविकाराचा झटका, ट्रिपल व्हेसल डिसीज सारख्या जीवघेणा आजारांना आळा घालण्यास मदत करते.

मधुमेहाच्या रूग्णांनी नियमित आहारात वांगीचा समावेश करणे आवश्यक आहे कारण ते फायबरचे समृद्ध स्त्रोत आहे, जे पचन योग्य करते. फायबरच्या उपस्थितीमुळे साखरेचे पचन चांगले होते आणि शोषण कमी होते. अशा वेळी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यात फारशी अडचण येत नाही.