Weight Loss : वजन कमी करण्यासाठी कोणता तांदूळ उपयुक्त?, पांढरा की ब्राऊन?; वाचा सविस्तर

| Updated on: May 28, 2021 | 3:40 PM

तांदूळ हे भारतातील काही भागात मुख्य अन्न आहे. तांदळापासून आपण बऱ्याच डिश तयार करू शकतो.

Weight Loss : वजन कमी करण्यासाठी कोणता तांदूळ उपयुक्त?, पांढरा की ब्राऊन?; वाचा सविस्तर
राईस
Follow us on

मुंबई : तांदूळ हे भारतातील काही भागातील मुख्य अन्न आहे. तांदळापासून आपण बऱ्याच डिश तयार करू शकतो. मात्र, तांदूळ खाल्ल्याने वजन वाढते, म्हणून बरेच लोक आहारात तांदूळ खाणे टाळतात. त्यामध्येही काही जणांनी वजन वाढते म्हणून पांढरा तांदूळ खाणे टाळून आहारात ब्राऊन राईस खाण्यास सुरूवात केली आहे. मात्र, खरोखरच ब्राऊन राईस खाल्ल्याने वजन वाढत नाही का? आपल्या आरोग्यासाठी नेमका कोणता तांदूळ फायदेशीर आहे हे आज आपण बघणार आहोत. (Brown rice is beneficial for weight loss)

पांढ-या तांदूळामध्ये तांदळाचे साल वेगळे केलेले असतात. तर ब्राऊन राईसमध्ये तांदूळ हे सालींसोबत असतात. यामुळेच ब्राऊन राईस आरोग्यासाठी खुप फायदेशीर आहे. ब्राऊन राईसमध्ये बॉडीसाठी आवश्यक न्यूट्रिएंट्स जसे की, मॅग्नेशियम, सेलेनियम आणि फॅटी अॅसिड्स पांढ-या तांदळाच्या तुलनेत जास्त असते. यामुळे ब्राऊन राईस खाल्लातरी आपले वजन वाढत नाही. जीवनसत्वे आणि खनिजे ब्राऊन राईस थायमिन, निअॅसिन, जीवनसत्व बी-6, मँगेनीज, मॅग्नेशियम, फॉस्फरस, लोह 2, जस्त इत्यादी घटक ब्राऊन राईसमध्ये असतात.

वजन कमी करताना कॅलरीचे सेवन लक्षात घेतले पाहिजे. ब्राऊन राईसमध्ये कमी कॅलरी कमी आढळतात. पांढर्‍या तांदळापेक्षा ब्राऊन राईसमध्ये जास्त फायबर असतात. फायबर जास्त असलेले अन्न चयापचय आणि पाचक प्रणाली सुधारण्यास मदत करते. हे वजन कमी करण्यास मदत करू शकते. म्हणून, वजन कमी करण्यासाठी ब्राऊन राईस हा एक चांगला पर्याय आहे. वजन कमी करण्यासाठी आपण आपल्या आहारात ब्राऊन राईसचा समावेश करावा.

ब्राउन राईसच्या खाण्याच्या अगोदर हे वाचा

1. ब्राऊन राईस पांढर्‍या तांदळाइतका चवदार नसतो.

2. पांढर्‍या तांदळापेक्षा ब्राऊन राईला शिजण्यास जास्त वेळ लागतो.

3. त्याला शिजवण्यासाठी जास्त पाणी लागते.

4. ब्राऊन राईस जास्त काळ टिकत नाहीय

5. ब्राऊन राईस ताजा खाणे अधिक फायदेशीर आहे

संबंधित बातम्या : 

Study | कोरोनाचा लैंगिक क्षमतेवर परिणाम, पुरुषांना होतोय ‘हा’ आजार

Skin Care Tips | लग्न करताय? ना ब्यूटी पार्लर, ना ट्रिटमेंट, ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा ग्लो!

(Brown rice is beneficial for weight loss)