अलर्ट! मोबाईलचा अति वापर टाळा, अन्यथा होऊ शकतो ‘या’ गंभीर आजारांचा धोका…

| Updated on: Dec 14, 2020 | 4:29 PM

विवोच्या अहवालानुसार, एप्रिल 2020नंतर मोबाईल फोनचा वापर पूर्वीच्या तुलनेत तब्बल 25 टक्क्यांनी वाढला आहे.

अलर्ट! मोबाईलचा अति वापर टाळा, अन्यथा होऊ शकतो ‘या’ गंभीर आजारांचा धोका...
Follow us on

मुंबई : कोरोना महामारीच्या काळात देशात मोबाईलच्या वापरात खूप झपाट्याने वाढ झाली आहे. मुलांच्या शिक्षणापासून ते ऑफिसची सर्व कामे मोबाईलच्या माध्यमातून हाताळली जात आहेत. तर दुसरीकडे, मनोरंजनाचे साधन म्हणूनही मोबाईलचा वापर वाढला आहे. मोबाईल हॅंडसेट कंपनी विवोने नुकताच याबाबत अभ्यास केला आहे (Cancer possibility boost due to increase mobile use).

विवोच्या अहवालानुसार, एप्रिल 2020नंतर मोबाईल फोनचा वापर पूर्वीच्या तुलनेत तब्बल 25 टक्क्यांनी वाढला आहे. कदाचित आपणही अशा लोकांच्या यादीत असू शकतो, जे मोबाईलचा अधिक वापर करतात, तर सावधगिरी बाळगा. कारण मोबाईल अति वापराची ही सवय तुम्हाला अनेक जीवघेण्या आजारांचा बळी बनवू शकते.

ब्रेन ट्युमर आणि कर्करोगाचा धोका

काही काळापूर्वी जागतिक आरोग्य संघटनेने आपल्या अहवालाद्वारे लोकांना मोबाईल फोनचा अति वापर टाळण्याचा इशारा दिला होता. एका अभ्यासानंतर डब्ल्यूएचओने आपल्या अहवालात म्हटले आहे की, मोबाईलचा अति वापर लोकांसाठी घातक ठरू शकतो. यामुळे होणारे रेडिएशन ब्रेन ट्युमर आणि ब्रेन कॅन्सरसारख्या गंभीर आजारांना निमंत्रण देऊ शकतात.

मानसिक आजारांचा धोका

काही लोकांना मोबाईलची इतकी सवय असते की, ते दररोज रात्री झोपताना मोबाईल जवळपास किंवा अगदी उशीखाली ठेवून झोपतात. जर, आपल्यालाही अशी सवय असेल तर, ती वेळीच मोडणे गरजेचे आहे. मोबाईलमधून उत्सर्जित होणाऱ्या किरणोत्सर्गामुळे मेंदूच्या पेशी संकुचित होण्याचा धोका वाढतो. अशा परिस्थितीत ऑक्सिजन मेंदूपर्यंत योग्यप्रकारे पोहोचत नाही. यामुळे नैराश्य, अल्झायमर, तणाव यासारख्या अनेक मानसिक समस्या उद्भवू शकतात (Cancer possibility boost due to increase mobile use).

वंध्यत्वाचे कारण

मोबाईलमधून उत्सर्जित होणारे रेडिएशन इतके हानिकारक आहे की, यामुळे डीएनएचे देखील नुकसान होऊ शकते. त्याच वेळी, याचा परिणाम गर्भवती महिलांच्या, गर्भाच्या शारीरिक आणि मानसिक विकासावर देखील होऊ शकतो.

खबरदारी घ्या!

  1. जर आपल्याला ऑफिसच्या कामापसाठी सतत मोबाईल वापरावा लागत असेल, तर त्यातूनही काहीवेळ ब्रेक घ्या.
  2. रात्री झोपताना मोबाईल जवळ ठेवू नका.
  3. फोनवर बोलण्यासाठी इअरफोनचा वापर करा.
  4. जेव्हा आवश्यक असेल तेव्हाच मोबाईल वायब्रेशन मोडमध्ये ठेवा.

(Cancer possibility boost due to increase mobile use)