उन्हाळ्यात सगळ्यात भारी, निरोगी, आणि चवदार गाजर कांजी! कशी बनवायची? वाचा

| Updated on: Mar 05, 2023 | 1:26 PM

आज आम्ही तुमच्यासाठी गाजर कांजी बनवण्याची रेसिपी घेऊन आलो आहोत. गाजर कांजीचे नियमित सेवन केल्याने आपले डोळे निरोगी राहतात. इतकंच नाही तर गाजर कांजी प्यायल्याने तुमची पचनशक्ती आणि रक्तदाबही चांगला राहतो.

उन्हाळ्यात सगळ्यात भारी, निरोगी, आणि चवदार गाजर कांजी! कशी बनवायची? वाचा
Gajar kanji
Image Credit source: Social Media
Follow us on

गाजर ही एक हंगामी भाजी आहे ज्यात व्हिटॅमिन-ए, कॅल्शियम, फायबर, अँटिऑक्सिडेंट, बीटा कॅरोटीन, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-के, पोटॅशियम आणि लोह यासारख्या गुणधर्मांचा साठा आहे. त्यामुळे गाजराच्या साहाय्याने लोक हिवाळ्यात लोणचे, पुडिंग, ज्यूस किंवा स्मूदी बनवून त्याचे सेवन करतात. पण तुम्ही कधी गाजर कांजी ट्राय केली आहे का? नसेल तर आज आम्ही तुमच्यासाठी गाजर कांजी बनवण्याची रेसिपी घेऊन आलो आहोत. गाजर कांजीचे नियमित सेवन केल्याने आपले डोळे निरोगी राहतात. इतकंच नाही तर गाजर कांजी प्यायल्याने तुमची पचनशक्ती आणि रक्तदाबही चांगला राहतो, तर चला जाणून घेऊया गाजर कांजी कशी बनवावी

गाजर कांजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • 250 ग्रॅम गाजर
  • 3 चमचे पिवळी मोहरी पावडर
  • 1/2 टीस्पून हळद पावडर
  • 2 चिमूट हिंग
  • 1 टीस्पून मोहरीचे तेल
  • मीठ
  • 2 लिटर आवश्यकतेनुसार पाणी

गाजर कांजी कशी बनवायची?

  • गाजर कांजी बनवण्यासाठी सर्वप्रथम गाजर सोलून घ्या.
  • यानंतर गाजर धुवून वाळवून त्याचे एक इंचाचे तुकडे करावेत.
  • नंतर एका भांड्यात अर्धा लिटर पाणी टाकून मध्यम आचेवर गरम करावे.
  • यानंतर पाणी उकळल्यावर त्यात गाजराचे तुकडे घालावे.
  • नंतर गाजर थोडा वेळ उकळून गॅस बंद करा.
  • यानंतर भांडे झाकून सुमारे १० मिनिटे बाजूला ठेवावे.
  • मग तुम्ही गाजर पाण्यातून काढून एका मोठ्या भांड्यात ठेवा.
  • त्यानंतर लाल तिखट, पिवळी मोहरी पावडर आणि हळद घाला.
  • यासोबतच चवीनुसार मीठ आणि तेल घालून चांगले मिक्स करावे.
  • नंतर उरलेले पाणी दुसऱ्या भांड्यात घालून मध्यम आचेवर गरम करावे.
  • यानंतर पाणी उकळल्यावर गॅस बंद करावा.
  • मग तुम्ही हे पाणी थंड होण्यासाठी सोडा.
  • यानंतर तुम्ही ते काचेच्या कंटेनरमध्ये ठेवा.
  • नंतर त्यात मसालेदार गाजर घालून त्यात हिंग पावडर घाला.
  • यानंतर त्याचे झाकण ठेवून काचेचा डबा सुमारे ३-४ दिवस उन्हात ठेवावा.
  • आता तुमची निरोगी गाजर कांजी तयार आहे.
  • हवं तर फ्रीजमध्ये ठेवून 10 दिवस पिऊ शकता.

(डिस्क्लेमर: दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. आम्ही याला दुजोरा देत नाही.)