benefits of carrot : हिवाळ्यात अनेक आजार डोकं वर काढत असतात. हवामानात बदल होत असताना अनेकांना सर्दी, खोकला तसेच त्वचेशी संबंधित आजार होत असतात. हिवाळ्यात प्रदुषण देखील यामागचं एक कारण असू शकतं. तुम्ही देखील या आजारांपासून बचाव व्हावा म्हणून आहारात विशेष काळजी घेतली पाहिजे. अनेक प्रकारच्या भाज्या आपल्या आहाराचा भाग असल्या पाहिजेत. त्यापैकीच एक म्हणजे गाजर. हिवाळ्यात आपण आहारात गाजराचा समावेश करावा. पण सोबतच गाजराचा ज्युस देखील घेऊ शकता. गाजरमध्ये बीटा-कॅरोटी, फायबर, व्हिटॅमिन K1, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स सारख्या पोषक तत्व असतात.
वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही गाजराचा आहारात समावेश करु शकता. कोशिंबीर, लोणचे, गाजराचा हलवा करुन तुम्ही खाऊ शकता. गाजर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. जाणून घेऊ त्याचे फायदे
गाजराच्या रसमध्ये असलेले पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते, जे तुमच्या हृदयासाठी खूप फायदेशीर आहे. गाजरातील अँटीऑक्सिडंट्स हृदयविकाराचा धोका कमी करू शकतात.
जर तुम्हाला तुमचे पचन सुधारायचे असेल तर तुमच्यासाठी गाजराचा रस हा एक उत्तम पर्याय आहे. यामध्ये असलेले फायबर पचनक्रिया उत्तम ठेवते. फायबर आतड्यांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवून बद्धकोष्ठता टाळण्यास मदत करू शकते.
गाजराचा रस प्यायल्याने त्वचेचे वृद्धत्व टाळता येते. हे तुमच्या त्वचेला सूर्यकिरणांमुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवते आणि तुमच्या त्वचेला नैसर्गिक चमक देते.
गाजर हे व्हिटॅमिन ए चा उत्कृष्ट स्त्रोत आहे, जो आपल्या डोळ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. त्यामुळेच गाजराचा रस पिण्यास स्वादिष्ट तर आहेच, शिवाय त्याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत.
गाजरात बीटा-कॅरोटीनसारखे अँटीऑक्सिडंट असतात, जे ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यास मदत करतात.
गाजराच्या रसामध्ये जीवनसत्त्वे आणि खनिजांसह आवश्यक पोषक घटक असतात, जे केवळ प्रतिकारशक्ती वाढवत नाहीत तर इतर आरोग्य फायदे देखील देतात.