Chandan facepack
Image Credit source: Social Media
मुंबई: चंदनाचा प्राचीन काळापासून त्वचेची काळजी घेण्यासाठी अवलंब केला जात आहे. चंदनामुळे त्वचेला थंडावा मिळतो, त्यामुळे उन्हाळ्यात चंदनाची पेस्ट तुमच्या त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरते. आज आम्ही तुमच्यासाठी चंदन पावडर फेसपॅक बनवण्याची पद्धत घेऊन आलो आहोत. उन्हाळ्यात चेहऱ्यावर चंदन लावल्यास टॅनिंग आणि डेड स्किनपासून सहज सुटका मिळू शकते. पिंपल्स आणि मुरुमांच्या समस्येने त्रस्त असाल तर चंदन तुमच्या समस्येवर रामबाण उपाय ठरू शकतं. इतकंच नाही तर चंदन तुमच्या चेहऱ्यावरील वृद्धत्वाची लक्षणं कमी करण्यासाठीही उपयुक्त ठरतं, तर चला जाणून घेऊया चंदन पावडर फेसपॅक कसा बनवायचा.
चंदन पावडर फेसपॅक बनवण्यासाठी आवश्यक
- चंदन पावडर आवश्यकतेनुसार २ चमचे
- पाणी
चंदन पावडर फेस पॅक कसा बनवावा?
- चंदन पावडर फेसपॅक बनवण्यासाठी एक छोटी वाटी घ्या.
- नंतर त्यात दोन चमचे चंदन पावडर घाला.
- यानंतर गरजेनुसार पाणी घालून संपूर्ण पेस्ट तयार करा.
- आता तुमचा चंदन पावडरचा फेसपॅक तयार आहे.
चंदन पावडर फेस पॅक कसा वापरावा?
- चंदन पावडर फेसपॅक लावण्यापूर्वी चेहरा नीट स्वच्छ करा.
- त्यानंतर तयार केलेला पॅक आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर चांगला लावा.
- यानंतर ते चांगले वाळायला सोडा.
- त्यानंतर पाण्याच्या साहाय्याने चेहरा स्वच्छ करावा.
- चांगल्या परिणामासाठी आपण आठवड्यातून 2 वेळा प्रयत्न करू शकता.
उन्हाळ्यात चेहऱ्यावर चंदन लावण्याचे फायदे
- वृद्धत्वाची लक्षणे कमी होण्यास मदत होते.
- यामुळे पिंपल्स आणि मुरुमांची समस्या दूर होऊ शकते.
- चेहऱ्यावरील डाग आणि पिग्मेंटेशन कमी होऊ शकते.
- चेहऱ्यावरील टॅनिंग दूर करण्यासाठी चंदन पावडर उपयुक्त ठरते.
- चंदन पावडरमुळे उन्हाळ्यात त्वचेला थंडावा मिळतो.
(डिस्क्लेमर: दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे.आम्ही याला दुजोरा देत नाही.)