स्वस्तात हनीमूनला जायचं? मग चिंता कशाला करता. आम्ही तुम्हाला असे काही हनीमून डेस्टिनेशन सांगणार आहोत, जिथे तुम्हाला मनमुराद आनंद घेता येईल. विशेष म्हणजे हे हनीमून डेस्टिनेशन्स तुमच्या बजेटमध्ये असेल. आता हे हनीमून डेस्टिनेशन्स नेमके कोणते आहेत, याविषयी जाणून घ्या.
आताची पिढी हनीमूनचा प्लॅन खूप विचार करून आखतात. पण, त्यातही पर्याय इतके असतात की, कुठे जावं आणि कुठे जावू नये, हे लक्षात येत नाही. प्रत्येकजण असे डेस्टिनेशन शोधत असतो जिथे ते आपल्या जोडीदारासोबत क्वॉलिटी टाईम घालवू शकतील. जोडप्यांना अनेकदा नैसर्गिक ठिकाणी जाणे आवडते किंवा त्यांना बीच साईट ही आकर्षक वाटते.
हनिमूनला जायचं म्हणल्यावर पैशाचा प्रश्न आलाच. आता प्रत्येक जोडप्याचं स्वतःचं बजेटही असतं. बजेटनुसार ते डेस्टिनेशन ठरवतात. कोणी चांगले आणि जास्त पैसे खर्च करून सुंदर लोकेशन्स किंवा महागड्या डेस्टिनेशन्समध्ये फिरतं. त्याचवेळी कोणी बजेटमध्ये प्लॅन आखतात.
तुम्हीही अशा डेस्टिनेशनच्या शोधात असाल तर कमी बजेटमध्ये तुमच्या पार्टनरसोबत चांगला वेळ घालवू शकाल. कारण, अशी अनेक ठिकाणं भारतात आहेत. चला जाणून घेऊया त्यांच्याविषयी.
बजेट हनीमून डेस्टिनेशन्स
लडाख
लडाख हे भारतातील सर्वात सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. येथे मोठ्या संख्येने लोक फिरण्यासाठी आणि साहसाचा आनंद लुटण्यासाठी येतात. तुम्हाला थंड जागा आवडत असेल तर तुमच्यासाठी हे सर्वोत्तम ठिकाण आहे. येथे कमी बजेटमध्ये हनीमून प्लॅन करता येऊ शकतो. येथे जाण्याचा आणि राहण्याचा खर्च 30 हजार रुपये असेल.
हंपी
हंपी कर्नाटकात वसलेले हे अतिशय सुंदर ठिकाण आहे. हे त्याच्या दऱ्या आणि टेकड्यांसाठी ओळखले जाते. येथे दूरदूरवरून जोडपी फिरण्यासाठी येतात. हवाई मार्गाने सहज पोहोचता. येथे कपल्स 35 हजार रुपयांमध्ये सहज फिरू शकतात.
जैसलमेर
जैसलमेर परफेक्ट हनीमून डेस्टिनेशन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजस्थानमध्ये वसलेले हे अतिशय सुंदर शहर आहे. येथे भेट दिल्यानंतर ऐतिहासिक स्थळे पाहून डेझर्ट सफारीचा आनंद लुटता येतो. येथे आपण प्रवास आणि 5 दिवसांच्या सहलीचा खर्च 30 हजार रुपये मानू शकता.
चक्रता
चक्रता हे भारतातील काही प्रसिद्ध आणि सुंदर ठिकाणांपैकी एक आहे. डेहराडूनजवळील हे एक सुंदर शहर आहे. हनीमूनसाठी जोडप्यांमध्ये खूप प्रसिद्ध आहे. इथे तुम्हाला नद्या, डोंगर, धबधबे, सगळं दिसेल. तुम्ही रेल्वे, बस आणि विमानाने येथे सहज पोहोचू शकता. 20 हजारपर्यंतच्या बजेटमध्ये कपल्स येथे सहज फिरू शकतात.
लक्षद्वीप
लक्षद्वीप हे पण बेस्ट आहे. तुम्हाला समुद्रकिनारा आणि नैसर्गिक देखावे आवडत असतील तर हे उत्तम डेस्टिनेशन आहे. तुम्हाला आजूबाजूला पाणी दिसेल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत पाण्याच्या मधोमध कॅंडल लाईट डिनर घेऊ शकता. लक्षद्वीपमध्ये येण्यासाठी विमाने आणि जहाजांचा वापर केला जाऊ शकतो. या सहलीचा खर्च 40 ते 50 हजार रुपये असणार आहे.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.)