मुंबई : चिकू हे फळ लहान मुलांपासून ते ज्येष्ठापर्यंच सर्वांनाच आवडते. चिकूचा शेक देखील खूप चवदार आणि पौष्टिक असतो. चिकूमुळे रोग प्रतिकारशक्ती देखील वाढते. चिकू एक पौष्टिक फळ असल्याने लहान मुलांच्या आहारात चिकूचा समावेश केला पाहिजे. मात्र, चिकू हे फळ मुलांसाठी सुरक्षित आहे की नाही याबद्दल नेहमीच प्रश्न असतो. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, लहान मुलांसाठी चिकू खाण्यासाठी सुरक्षित आहे की नाही. (chiku is beneficial for the health of children)
-चिकूमध्ये व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सी असते. व्हिटॅमिन सी रोग प्रतिकारशक्ती वाढवते आणि व्हिटॅमिन ए डोळ्यांसाठी चांगले असते. व्हिटॅमिन बी 6 बाळाच्या मेंदूचा विकास आणि हिमोग्लोबिनची पातळी वाढविण्यात मदत करते.
-सहा महिन्यांच्या बाळाला आपण मॅश करुन चिकू देऊ शकतो. बाळासाठी चिकू खाणे सुरक्षित आहे. त्याचे बरेच फायदे आहेत जसे की ते रोग प्रतिकारशक्ती चांगली होते आणि पोट स्वच्छ राहते.
-चिकूमध्ये पोटॅशियम, लोह, कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. यात फॉलिक अॅसिड असते. चिकूमध्ये खनिजे आणि जीवनसत्त्वे असल्यामुळे बाळाला ऊर्जा मिळते.
-चिकूमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असतात. जे पाचन सुधारते आणि बद्धकोष्ठतेपासून दूर करते. चिकू बद्धकोष्ठतेवर उपचार करतात.
-बाळाला जो चिकू घाऊ घालणार आहात तो चिकू नेहमी पिकलेला असावा त्यामुळे गिळणे आणि पचन करणे सोपे जाते. कच्चा चिकू खाल्ल्याने घशात जळजळ होते आणि श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
-लहान मुलांना चिकू खाऊ घालताना चिकूची साल आठवणीने काढली पाहिजे.
संबंधित बातम्या :
Health | केसांपासून ते पायाच्या नखांपर्यंत, शरीरातील अनेक समस्यांवर गुणकारी ‘कांदा’!
Skin Care | सणासुदीच्या काळात ‘या’ चार गोष्टी मुरुमांपासून सुरक्षित ठेवतील!
हंगामी सर्दी-खोकल्यावर रामबाण उपाय ‘काळीमिरी’, जाणून घ्या याचे महत्त्वाचे फायदे…https://t.co/pe3zkVHUt4#BlackPepper #health
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 25, 2020
(chiku is beneficial for the health of children)