आज आम्ही तुम्हाला गोव्याजवळचं एक खास डेस्टिनेशनविषयी माहिती सांगणार आहोत. गोव्याला बहुतांश लोक कंटाळवाणे पर्यटनस्थळ समजू लागले आहेत. खरं तर यामागचं कारण म्हणजे गोव्यात बीच आणि नाईट लाईफएन्जॉय करण्यापलीकडे काही खास करण्यासारखं नाही, असं लोकांना वाटतं. जर तुम्हालाही असेच वाटत असेल तर तुम्ही चुकीचे आहात.
गोव्यात तुम्ही वन्यजीवांचा आनंद तर घेऊ शकताच, पण इथे अनेक ऑफबीट स्पॉट्स आहेत, ज्यांचे सुंदर नजारे तुम्हाला भुरळ घालण्यात कोणतीही कसर सोडणार नाहीत.
गोव्यापासून अवघ्या 68 किमी अंतरावर असलेले हिल स्टेशन. इथलं सौंदर्य मंत्रमुग्ध करणारं आहे. या हिल स्टेशनचे नाव आहे चोरला घाट, जिथे तुम्हाला नेत्रदीपक धबधबे पाहायला मिळतील. चोरला घाट हा पश्चिम घाटाच्या सौंदर्याचा उत्तम नमुना आहे. चोरला घाट गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवर राष्ट्रीय महामार्ग 4 वर आहे.
चोरला घाटात कशाला जायचे?
चोरला घाटात उत्तम धबधब्याच्या दृश्यांबरोबरच पक्ष्यांच्या अनेक प्रजाती पाहायला मिळतील. म्हादई वन्यजीव अभयारण्यात मलबार व्हिसलिंग थ्रशसारखे दुर्मिळ पक्षी पाहायला मिळतात. याशिवाय अंजुनेम धरणालाही भेट देता येते. जर तुम्हाला अॅडव्हेंचर आवडत असेल आणि ट्रेक करायचा असेल तर लासनी टेंब किंवा वज्र धबधब्याच्या शिखरावर ट्रेक करू शकता.
चोरला घाट हा सह्याद्री पर्वतरांगेचा एक भाग आहे, ज्याला पश्चिम घाट असेही म्हटले जाते. पश्चिम घाट हे युनेस्कोचे जागतिक वारसा स्थळ असून जगातील जैवविविधतेच्या आठ हॉटस्पॉटपैकी एक आहे. अशा परिस्थितीत चोरला घाट हा पश्चिम घाटाचा अविभाज्य भाग आहे कारण येथील हिरव्यागार जंगलात अनेक प्राणी-पक्ष्यांचे वास्तव्य आहे. येथील निसर्ग सौंदर्य पाहण्यासारखे आहे.
चोरला घाटात कसे पोहोचावे?
रस्त्याने प्रवास करायचा असेल तर कारने सहलीचे प्लॅनिंग करू शकता. चोरला घाट गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यांशी चांगला जोडलेला आहे. आपण आपल्या सोयीनुसार आणि बजेटनुसार ट्रॅव्हल मोड निवडू शकता.
बस हादेखील एक चांगला पर्याय: जर तुम्ही बसने जाण्याचा विचार करत असाल तर हा सर्वात किफायतशीर आणि सोयीस्कर पर्याय आहे. चोरला घाटात ये-जा करण्यासाठी अनेक बसेस सहज उपलब्ध होतील.
ट्रेननेही जाऊ शकता: जर तुम्हाला ट्रेनने प्रवास करायचा असेल तर हा देखील एक चांगला पर्याय आहे. तसे चोरला घाटात जाण्यासाठी थेट गाडी नाही, त्यामुळे गोव्याला रेल्वेने प्रवास करता येतो. यानंतर तुम्ही कोणत्याही टॅक्सी किंवा बसने प्रवास करू शकता.