25 डिसेंबरला ख्रिसमस आहे. मग आपल्याला ख्रिसमसचं म्हटलं की आठवतं ख्रिसमस ट्री, चॉकलेट्स, गिफ्ट, वेगवेगळे केक, अनेक पदार्थ. पण लहान मुलं ख्रिसमस आला की खास वाट पाहतात ते सांताक्लोजची आणि सांता हा बच्चेकंपनीचा फेव्हरेट. कारण तो या मुलांसाठी गिफ्ट आणतो. लाल कपडे घातलेला, पांढरी लांब दाढी लावला सांता. या ख्रिसमेसला आपल्या बच्चेकंपनींना खूष करा. त्यासाठी आम्ही तुम्हाला भन्नाट गिफ्टची आयडिया देणार आहोत.
लहान मुलांना सांता आजोबा खूप आवडतात. त्यामुळे तुम्ही या लहान मुलांना सांतावाली बेडशीट देऊ शकतात. रात्री झोपताना त्यांचे सांता आजोबा त्यांचा सोबत असतील. त्यांना हे गिफ्ट खूप आवडेल.
ही गिफ्ट लहान मुलांसाठी अतिशय प्रेरणादायी आहे. मुलांमध्ये अभ्यासाची गोडी लागावी म्हणून तुम्ही त्यांना सांताची नोटबूक देऊ शकता. कारण सांता लहान मुलांवर खूप प्रेम करतो. ही लहान मुलं सांता आजोबांना खूप मानतात. त्यामुळे त्यांनी दिलेलं हे गिफ्ट त्यांना नक्की प्रेरणा देणार.
तुम्हाला जर लहान मुलांना काही वेगळं द्यायचं असेल तर तुम्ही त्यांना म्युजिकल इंस्ट्रूमेंट देऊ शकतो. यातून त्यांना संगीताची गोडी लागेल. यासोबत तुम्ही सांताचा ड्रेस त्यांना गिफ्ट करु शकता.
लहान मुलांना गेम्स खूप आवडतात. त्यामुळे तुम्ही त्यांना मेंदूला चालना देतील, त्या गेम्समधून त्यांना काहीतरी नवीन शिकायला मिळेल असे गिफ्ट देऊ शकता. सांतावाला टेडी पण तुम्ही लहान मुलांना देऊ शकतात.
घरात खूप लहान मुलं असतील किंवा तुम्हाला बिल्डिंगमधील लहान मुलांसाठी हा ख्रिसमस खास करायचा असेल तर तुम्ही त्यांच्यासाठी ख्रिसमस पार्टी देऊ शकता. आणि सांता बनून त्यांना चॉकलेट आणि केक देऊ शकता. चॉकलेट आणि केक घरी बनवला असेल तर बच्चेकंपनी जास्त खूष होतील.
iPhone 14 Pro मध्ये 48MP कॅमेरा आणि 8GB RAM मिळणार, जाणून घ्या कसा असेल नवीन स्मार्टफोन
Xiaomi चं Redmi Watch 2 Lite स्मार्टवॉच बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स