न धुताच स्वच्छ करू शकता कोट, जॅकेट; कसं ते जाणून घ्या…

| Updated on: Jan 03, 2025 | 3:15 PM

हिवाळ्यामध्ये कोट आणि जॅकेटचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. पण हे कपडे धुवायला थोडेसे कठीण असतात. तसेच त्यांना सुकायला देखील वेळ लागतो. परंतु जॅकेट आणि कोट वर असलेली घाण आणि धूळ काढून टाकणे देखील खूप महत्त्वाचा आहे. या टिप्स वापरून तुम्ही सोप्या पद्धतीने कोट आणि जॅकेट स्वच्छ करू शकता.

न धुताच स्वच्छ करू शकता कोट, जॅकेट; कसं ते जाणून घ्या...
न धुताच स्वच्छ करू शकता कोट, जॅकेट
Image Credit source: Instagram
Follow us on

दिवसेंदिवस थंडी वाढत चालली आहे. अशा हवामानात लोक जास्त जॅकेट आणि कोट घालतात. त्यामुळे शरीराला थंडीपासून वाचवण्यास मदत होते. तुम्हाला बाजारात अनेक प्रकारचे कोट आणि जॅकेट मिळतील. वेगवेगळ्या कार्यक्रमाप्रमाणे लोक वेगवेगळे कोट आणि जॅकेट परिधान करत असतात पण कधी कधी ते स्वच्छ करणे कठीण होते. प्रत्येक वेळेला घातल्यानंतर जॅकेट आणि कोट धुणे शक्य नसते. ते यामुळेच लवकर खराब होऊ शकतात.

जॅकेट आणि कोट धुण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. तसेच ते सुकायला देखील खूप वेळ लागतो. परंतु त्याच्यावर साचलेली धूळ काढून त्याची स्वच्छता करणे आवश्यक आहे. कारण तुम्ही तेच घाणेरडे जॅकेट आणि कोट पुन्हा पुन्हा घालू शकत नाही. त्यामुळे तुम्ही जॅकेट आणि कोट न धुता कशा प्रकारे स्वच्छ करू शकता ते जाणून घेऊ.

ब्रशचा वापर करा

कोटच्या मागच्या बाजूवर धूळ आणि घाण जमा होऊ शकते. यासाठी तुम्ही स्वच्छ ब्रश वापरू शकता. कोट वर हलक्या हाताने ब्रश फिरवा जेणेकरून कोटवर जास्त दाब पडणार नाही. यामुळे कोटवर साचलेली का निघून जाईल आणि ते खराब होण्यापासून वाचतील. तसेच लोकरीचा कोट धुण्यासाठी टब मध्ये कोमट पाणी करा आणि त्यामध्ये लहान मुलांचा शाम्पू टाका आणि तो व्यवस्थितपणे मिक्स करा. त्या पाण्यात कोट अर्धा तास भिजत ठेवा आता तो पिळून घ्या आणि टॉवेलवर ठेवा आणि संपूर्ण कोरडा होऊ द्या. लोकरीचा कोट धुण्यासाठी गरम पाणी, रासायनिक उत्पादने आणि कठोर डिटर्जंट पावडर वापरू नका.

हे सुद्धा वाचा

शाम्पू

जर कोट किंवा जॅकेट तुम्ही घरी धुत असाल तर त्यावर तेल किंवा इतर डाग असतील तर तुम्ही ते कोरड्या शाम्पूने स्वच्छ करू शकतात. ते कापडावर हलके स्प्रे करा आणि काही वेळ तसेच राहू द्या. नंतर स्वच्छ ब्रशने त्यावर घा. यामुळे कपड्यावरील घाण आणि डाग दोन्हीही निघून जातील.

ओला कपडा

जॅकेट न धुता त्यावर अडकलेली धूळ काढण्यासाठी तुम्ही ओल्या कपड्याचा वापर करू शकता. यासाठी टॉवेल किंवा रफ कपडा घेऊन तो पाण्यात हलका भिजवा. त्यानंतर तो चांगला पिळून घ्या. लक्षात ठेवा की टॉवेल थोडा ओला असावा. आता त्या ओल्या कापडाच्या मदतीने संपूर्ण जॅकेट पूर्णपणे स्वच्छ करा.

फर जॅकेट

फर जॅकेट वॉशिंग मशीन मध्ये न धुता हाताने धुवा. याशिवाय जॅकेट धुण्याची पद्धत त्यावर लिहिलेली असते त्यानुसारच धुवा. त्यामुळे कोणतेही कापड धुण्यापूर्वी एकदा त्यावर लिहिलेल्या सूचना आवश्य वाचा. जॅकेट आणि कोट धुण्यापूर्वी त्यांचे लेबल नेहमी तपासा. वॉशिंग मशीन मध्ये बहुतेक जॅकेट आणि कोट धुण्याची शिफारस केल्या जात नाही.