मुंबई : कोरोनापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी ‘रोगप्रतिकारक शक्ती’ हा सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी नेमक्या कोणत्या पदार्थांचे सेवन करावे याबाबत नेहमी अनेक लोक संभ्रमात असतात. सध्या कोरोना महामारीच्या काळात जो-तो आपल्या कुटुंबासह स्वतःची काळजी घेण्यात व्यस्त आहे. साफसफाईपासून ते सोशल डिस्टंसिंगपर्यंत सगळ्या गोष्टींकडे बारकाईने लक्ष दिले जात आहे. (Clove and Liquorice are beneficial for boosting the immune system)
या सगळ्यासोबत कोरोनापासून बचावासाठी सगळ्यात महत्त्वाची आहे ‘रोगप्रतिकारक शक्ती’. रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढवावी, याविषयी सगळेच संभ्रमात असतात. मात्र, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आज आम्ही तुम्हाला खास आणि सोप्पा काही टिप्स सांगणार आहोत. त्याच्या सहायाने तुम्ही आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करू शकता. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपल्याला लवंग आणि ज्येष्ठमधाची पावडर लागणार आहे.
आपण दिवसातून तीन वेळा लवंग पावडर, ज्येष्ठमध पावडर आणि साखर एकत्र मिक्स करून घेतली तर आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. यामुळे आपण कोरोनासारख्या आजारांपासून देखील दूर राहू शकतो. कोरोना काळात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपल्या चहामध्ये जेष्ठमध आणि लवंगचा समावेश केला पाहिजे. ज्यामुळे संसर्ग टाळण्यास मदत होते. बरेच लोक चहामध्ये वेलची, मध, आले, तुळस आणि गूळ वापरतात.
हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. आपण चहामध्ये जेष्ठमध मिसळू शकतो. त्यात अँटी-व्हायरल आणि अँटी-ऑक्सिडंट असतात. ते आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यात मदत करतात. आयुर्वेदात जेष्ठमध एक औषध म्हणून वापरले जाते. सर्दी, खोकला यासारख्या समस्यांवर मात करण्यात ते मदत करते. दररोज चहामध्ये लवंगाचे सेवन केले जाऊ शकते. यात अँटी व्हायरल आणि अँटी ऑक्सिडंट गुणधर्म आहेत. हे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यात मदत करू शकते.
लवंग रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. लवंगमध्ये पोटॅशियम, प्रथिने, लोह, सोडियम, कर्बोदके, कॅल्शियम आणि हायड्रोक्लोरिक आम्लाचे प्रमाण देखील असते. लवंगामध्ये व्हिटामिन ए आणि सी देखील आढळतात. तसेच त्यात मॅग्नेशियम आणि फायबर देखील भरपूर प्रमाणत आढळतात. लवंगामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडेंट असतात. अँटीऑक्सिडंट ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करतात.
(कोणत्याही कृतीपूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.)
संबंधित बातम्या :
Weight Loss Drinks | स्लिम-ट्रिम दिसण्याची इच्छाय? मग, झोपण्यापूर्वी प्या ‘हे’ हेल्दी ड्रिंक्स!
Hair Mask | केस गळती, रुक्षपणा समस्या होणार दूर, ‘हा’ हेअर मास्क ठरेल केसांसाठी वरदान!https://t.co/eedFAgnEcM#HairCare #HairMask
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 19, 2020
(Clove and Liquorice are beneficial for boosting the immune system)