मुंबई : खोबरेल तेल आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. खोबरेल तेल रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यात खूप मदत करते. शुध्द नैसर्गिक खोबरेल तेल अनेक व्याधींवर गुणकारी ठरते. नारळाच्या तेलात मोनोलोरीन असते, जे शरीरातील अपायकारक जीवाणू नष्ट करण्यास मदत करते. यासह वजन कमी करण्यासाठी देखील खोबरेल तेल खूप फायदेशीर आहे. (Coconut oil is beneficial for boosting immunity)
-खोबरेल तेल नैसर्गिक, किफायतशीर आणि सहज उपलब्ध होणारे आहे. केसांच्या अनेक समस्यांचे निराकरण करण्यासाठी हे प्रभावी आहे. अशा परिस्थितीत, अनावश्यक महागड्या हेअर केअर उत्पादनांऐवजी नारळाचे तेल वापरणे अतिशय लाभदायी ठरते.
-खोबरेल शक्यतो आपण खाण्यासाठी वापरत नाहीत. मात्र, खोबरेल तेल खाण्याच्या पदार्थांमध्ये वापरणे आरोग्यासाठी चांगले असते. भाज्यांमध्ये जास्तीत-जास्त प्रमाणात खोबरेल तेल वापरले पाहिजे.
-खोबरेल तेल त्वचेसाठी चांगले असते. हात, पाय आणि चेहऱ्यावर नियमितपणे खोबरेल तेलाने मसाज केल्यास त्वचा मुलायम आणि चांगली होते.
-तुमचे जर ओठ सतत उलत असतील तर ओठांवर खाेबरेल तेल लावा. यामुळे तुमचे ओठ मऊ होतील. रात्री झोपण्याआधी सुरकुतलेल्या ओठांवर खोबरेल तेल लावा.
-चेहऱ्यावर मुरूम येत असले तर खोबरेल तेलाचा वापर तुम्ही करु शकता. खोबरेल तेलाच्या नियमित वापराने चेहऱ्यावरचे पुरळ कमी होण्यास मदत होते.
संबंधित बातम्या :
Papaya Seeds Benefit | तुम्ही पपईच्या बिया फेकून देताय…? तर थांबा अगोदर हे वाचा!
Milk Testing : सावधान! घट्ट दिसण्यासाठी दुधात मिसळले जातायत ‘हे’ घटक, अशी तपासा दुधाची शुद्धता
Immunity Booster | थंडीच्या दिवसांत आवळ्याचा रस आरोग्यवर्धक, इम्युनिटी वाढवण्यासाठी ‘हे’ नक्की ट्राय करा!https://t.co/XPmKiIDsHE#ImmunityBooster #AmlaJuice
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 28, 2020
(Coconut oil is beneficial for boosting immunity)