Common Lifestyle Mistakes: निरोगी आयुष्य जगायचंय?, मग या पाच सवयी सोडाच

| Updated on: Dec 28, 2021 | 1:20 PM

आजच्या युगामध्ये कमी वयात देखील अनेकांना हृदय विकाराचा झटका येतो. हृदय विकाराचा धक्का तीव्र असल्यास तुमचा मृत्यू होण्याची दाट शक्यता असते. चुकीची जीवनपद्धत आणि खाण्या-पिण्याच्या सवयी ही हृदय विकाराचे प्रमाण वाढण्याची मुख्य कारणे आहेत.

Common Lifestyle Mistakes: निरोगी आयुष्य जगायचंय?, मग या पाच सवयी सोडाच
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

Common Lifestyle Mistakes :आजच्या युगामध्ये कमी वयात देखील अनेकांना हृदय विकाराचा झटका येतो. हृदय विकाराचा धक्का तीव्र असल्यास तुमचा मृत्यू होण्याची दाट शक्यता असते. चुकीची जीवनपद्धत आणि खाण्या-पिण्याच्या सवयी ही हृदय विकाराचे प्रमाण वाढण्याची मुख्य कारणे आहेत. आरोग्याची काळजी न घेणे, अवेळी जेवण करणे, पथ्य न पाळणे, चुकीच्या पद्धतीने बसणे, अधिक मद्यपान करणे या सवईमुळे तुम्हाला भविष्यात गंभीर आजार होऊ शकतात. या आजारांमध्ये हृदय विकार, किडनीशी संबंधित आजार, तसेच मानसिक आजारांचा समावेश होतो. असे आजार हे शरीरासाठी हानिकारक असतात. अशा कोणत्या चुकीच्या सवई आहेत, ज्या तुम्हाला पुढे चालून अडचणीच्या ठरू शकतात, त्याबद्दल आपण आज जाणून घेणार आहोत.

नियमित व्यायाम न करणे

वयाचे 40 वर्ष पूर्ण केल्यानंतरही तुम्ही जर व्यायाम करत नसाल तर सावधान व्हा, या वयात तुम्हाला दररोज कमीतकमी अर्धातास व्यायामाची आवश्यकता असते. चाळीसी पार केल्यानंतर तुम्ही तुमचे डेली रूटीन ठरून घ्या. डायट प्लॅन बनवा. असे केल्यास तुम्ही दीर्घकाळ आजारापासून दूर राहू शकतात. मात्र तुम्ही जर नियमित व्यायाम न केल्यास तुम्हाला लठ्ठापणा सारख्या समस्येचा सामना करावा लागू शकतो. पुढे हा लठ्ठपणाच अनेक आजारांना आमंत्रण देतो.

चुकीच्या पद्धतीने बसणे

तुम्ही तुमच्या बसण्याच्या पद्धतीचा एकदा चांगला अभ्यास करा, जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने बसत असाल तर तुम्हाल पाठ, कंबर याच्याशी संबंधित आजार होऊ शकतात. हे दुखणे बळावल्यास अनेक समस्या निर्माण होतात.

धूप्रमान

तुम्ही जर नियमित धूम्रपान करत असाल तर ही सवय वेळीच बदला, कारण वाढते धूम्रमान हे हृदय विकार उद्धभवण्याचे सर्वात मोठे कारण आहे. धूम्रपान हे आरोग्यास हाणीकारणक असून, धुम्रपानामुळे विविध आजार होऊ शकतात.

ब्रेन एक्ससाईज नियमित करा

वयाची चाळीशी ओलांडल्यानंतर ब्रेन एक्ससाईज नियमित करा, ब्रेन एक्ससाईज केल्यामुळे स्मुतीभ्रंशासारख्या गंभीर आजाराचा धोका कमी होतो. तसेच ब्रेनहॅम्रेज सारख्या आजारापासून देखील बचाव होतो.

नियमितपणे रक्तदाब चेक करा

रक्तदाब हा नेहमी सामान्य असावा, अति रक्तदाब किंवा कमी रक्तदाब हा विविध आजारांना आमंत्रण देतो. आपला रक्तदाब किती आहे. याची माहिती आपल्याला हवी. त्यानुसार योग्य ते उपचार करता येतात. म्हणून नियमितपणे डॉक्टरांच्या सल्ल्याने रक्तदाब चेक करा.

संबंधित बातम्या 

Health | व्हिटॅमीन डीची कमी सहज घेऊ नका, रोगप्रतिकार शक्तीशी संबंधित आजार होऊ शकतात; कशी घ्याल काळजी?

Omicron Alert: औरंगाबादेत आता मुलांना लस, ज्येष्ठांना बूस्टर डोस, वाचा कुणाला कोणती लस मिळणार?

Mumbai | रुग्णवाढीची धास्ती, पालिका मुख्यालयात आढावा बैठक, नियम कठोर करण्यासोबतच आयुक्त काय म्हणाले?