Jupiter-Saturn conjunction : तब्बल 397 वर्षांनंतर गुरु-शनी ग्रह जवळ येणार, तुम्हीही पाहू शकता निसर्गाचं आश्चर्यकारक दृश्य

| Updated on: Dec 21, 2020 | 1:26 PM

Jupiter-Saturn conjunction in Marathi : सूर्यास्तानंतर लोक कुठल्याही उपकरणाच्या मदतीशिवाय दोन्ही ग्रहांना पाहू शकतात.

Jupiter-Saturn conjunction : तब्बल 397 वर्षांनंतर गुरु-शनी ग्रह जवळ येणार, तुम्हीही पाहू शकता निसर्गाचं आश्चर्यकारक दृश्य
आजचा दिवस अनेक गोष्टींमुळे खास असणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तब्बल 397 वर्षानंतर आपल्या सौर मंडळाचे दोन मोठे ग्रह, गुरू (jupiter) आणि शनि (saturn) एकमेकांच्या अगदी जवळ येणार आहे.
Follow us on

मुंबई : अवकाश एक खास अशी खगोलशास्त्रीय घटना पाहण्याची संधी खगोलप्रेमींना पाहायल मिळणार आहे. यामध्ये आपल्या सौर मंडळाचे दोन मोठे ग्रह, गुरू (jupiter) आणि शनी (saturn) एकमेकांच्या अगदी जवळ येणार आहे. सगळ्यात विशेष म्हणदे हे दोनही ग्रह याआधी 17 व्या शतकात खगोलशास्त्रज्ञ गॅलिलिओ यांच्या काळात इतके जवळ आले होते. सोमवारी सूर्यास्तानंतर लोक कुठल्याही उपकरणाच्या मदतीशिवाय दोन्ही ग्रहांना पाहू शकतात. अवकाशप्रेमींसाठी हा सगळ्यात खास क्षण असणार आहे. (conjunction of saturn and jupiter on 21 december updates know how to see)

सहजपणे पाहू शकता दोन्ही ग्रहांचं मिलन

अमेरिकेच्या अंतराळ संस्था नासाने दिलेल्या माहितीनुसार, आपल्या सौर मंडळात दोन मोठे ग्रह जवळ येणं हे फारसं दुर्मीळ नाही. पण गुरू हा ग्रह त्याच्या जवळ असणाऱ्या शनि ग्रहाजवळ प्रत्येक 20 वर्षानंतर जातो. पण या ग्रहांचं आता जवळ येणं खूप विशेष आहे. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, त्यांच्या अंदाजे या दोन ग्रहांमधील अंतर फक्त 0.1 डिग्री असेल. जर हवामान अनुकूल असेल तर सूर्यास्तानंतर जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातून तुम्ही हे ग्रहांचं मिलन पाहू शकता.

21 डिसेंबर रोजी आकाश दिसणार

21 डिसेंबर 2020 रोजी हे दोन्ही ग्रह जवळ येणार आहेत. तो दिवस वर्षाचा सर्वात लहान दिवस मानला जातो. वँडरबिल्ट विद्यापीठातील खगोलशास्त्राचे प्राध्यापक डेव्हिड वेन्ट्रॉब याविषयी म्हणाले की, ही घटना एखाद्या व्यक्तीच्या जीवनात फक्त एकदाच घडते. त्यामुळे तुम्ही विचार करू शकता हा क्षण सर्वांसाठी किती महत्त्वाचा आहे.
397 वर्षानंतर गुरू आणि शनि पुन्हा जवळ येणार

आश्चर्याची बाब म्हणजे जुलै 1623 मध्ये हे दोन्ही ग्रह इतके जवळ आले होते. पण सूर्याजवळ असल्यामुळे त्यांना पाहणं जवळजवळ अशक्य होतं. यानंतर, मार्चमध्ये 1226 पूर्वी, दोन ग्रह जवळ आले आणि ही घटना पृथ्वीवरुन पाहिली गेली होती. (conjunction of saturn and jupiter on 21 december updates know how to see)

इतर बातम्या – 

‘वर्क फ्रॉम होम’मुळे तरुणांमध्ये मृत्यूचा वाढता धोका, संशोधनाचा धक्कादायक अहवाल

तर सातारची सून झालेल्या काश्मीरच्या कन्येचा प्रॉपर्टीवरचा हक्क अबाधित राहणार?

(conjunction of saturn and jupiter on 21 december updates know how to see)