Constipation: रोजच्या या सवयींमुळे बिघडते पोट, आजपासूनच बदल करा़

| Updated on: Dec 13, 2023 | 4:53 PM

constipation causes : आहारात चुकीच्या गोष्टी आल्यानंतर त्याचा आरोग्यावर निश्चितच परिणाम होत असतो. आहार जर चांगला नसेल तर रोगप्रतिकारशक्तीही कमकुवत होत जाते. चुकीच्या आहारामुळे मग पोट ही बिघडते. आहारा शिवाय काही सवयी देखील पोट बिघडण्यासाठी जबाबदार असतात. कोणत्या ते जाणून घेऊयात.

Constipation: रोजच्या या सवयींमुळे बिघडते पोट, आजपासूनच बदल करा़
CONSIPATION
Follow us on

Causes of Constipation : स्पर्धेच्या युगात आपली जीवनशैली पूर्णपणे बदलली आहे. चुकीच्या आहारामुळे आपली रोगप्रतिकारशक्तीही कमकुवत होत चालली आहे. त्यामुळेच हवामानात बदल झाला की, अनेक जण आजारी पडतात. हिवाळा ऋतू सुरु होताच अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. यापैकी एक समस्या म्हणजे बद्धकोष्ठता. हिवाळ्यात अनेक लोकांना याचा त्रास होतो.

बदलती जीवनशैली आणि फास्ट फूडमुळे आरोग्यावर खोलवर परिणाम होतो आहे. बद्धकोष्ठता याचाच एक परिणाम आहे. ही समस्या आपल्या दैनंदिन कामात अनेकदा अडथळा निर्माण करते. तुम्ही देखील या समस्यांनी त्रस्त असाल तर आज या लेखात आम्ही तुम्हाला तुमच्या अशा काही सवयींबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे बद्धकोष्ठता होऊ शकते.

पटापट जेवणे

अनेकांना पटापट जेवण्याची सवय असते. अशा परिस्थितीत तर तुम्ही अन्न जास्त न चावता गिळण्याचा प्रयत्न केला तर याचा परिणाम पोटावर होतो. ज्यामुळे पोट फुगणे आणि गॅस होऊ शकतो आणि बद्धकोष्ठता होऊ शकते.

प्रोसेस फूड

लोकांच्या खाण्याच्या सवयी झपाट्याने बदलत आहेत. बरेच लोकं आता प्रोसेस फूड खात आहेत. अशा पदार्थांमध्ये चरबी, अतिरिक्त साखर आणि कृत्रिम घटक असल्याने पचनाला त्याचा त्रास होतो.

नाश्ता न करणे

सकाळच्या घाईमुळे अनेकदा लोक न्याहारी करत नाहीत. अशा परिस्थितीत सकाळी लवकर नाश्ता न केल्यामुळे तुमची पचनक्रिया बिघडते आणि बद्धकोष्ठता होऊ शकते.

दारूची सवय

दारू आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे हानिकारक आहे. यामुळेच अनेकदा डॉक्टर आणि तज्ज्ञ लोकांना यापासून दूर राहण्याचा सल्ला देतात. जर तुम्हाला दारू पिण्याचे व्यसन असेल तर ते तुमच्या पोटाच्या अस्तरांना त्रास देऊ शकते आणि पचनक्रियेमध्ये व्यत्यय आणू शकते.

डिहायड्रेशन

निरोगी राहण्यासाठी खूप पाणी पिले पाहिजे. तुम्ही जर पाणी पित नसाल तर यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते. ज्यामुळे पोटचे कार्य देखील बिघडते. पाणी कमी पिल्याने अन्न पचनास त्रास होऊ शकतो.